![]() |
आष्टा-इस्लामपूर रस्त्यावर भीषण अपघात |
आष्टा : आष्टा-इस्लामपूर रस्त्यावर भरधाव डंपरने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत पिता-पुत्र जागीच ठार झाले असून पत्नी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या मन हेलावणाऱ्या अपघातात पितापुत्रांची डोकी धडावेगळी झाली होती. अंकुश शिवाजी साळुंखे (वय ४०), आदित्य अंकुश साळुंखे (वय १४) अशी मृत पिता पुत्रांची, सोनाली अंकुश साळुंखे (वय ३४ रा. हजारमाची) असे जखमीचे नाव आहे.
आष्टा – इस्लामपूर रस्त्यावर मंगळवारी सकाळी ९.०० वाजता हा अपघात झाला. पोलिस निरीक्षक अजीत सिद्ध, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनमित राऊत यांनी घटनास्थळी भेट देवून मदतकार्य केले.मयत अंकुश हे पत्नी सोनाली, मुलगा आदित्य यांना घेवुन सीडी डीलक्स मोटरसायकल (क्र.MH -50-R-1676) वरून आष्ट्याकडून इस्लामपूरच्या दिशेने निघाले होते.आहिरवाडी फाटा वळणावर आले असता इस्लामपूर कडून आष्ट्याकडे निघालेल्या भरधाव (dumper) डंपरने साईड बदलून मोटरसायकलला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की धडकेत अंकुश व आदित्य दोघे जागीच ठार झाले. तर सोनाली या गंभीर जखमी झाल्या. डंपर चालकांने बेदरकापणे डंपर न थांबवता आष्ट्याच्या दिशेने पळविला. घटनास्थळी प्रवाशांची गर्दी असल्याची पोलिसांना माहिती दिली.
अपघाताची भयानकतेची तीव्रता इतकी होती की आदित्यच्या डोक्यावरुन चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. तर अंकुश यांच्या धडाला डोकंच नव्हते. उपस्थीत सर्वचजण परिसरात डोक्याचा शोध घेत होते. पोलिस निरिक्षक अजीत सिद, मनमित राऊत घटनास्थळी आले. नागरिकांनी माहिती दिली. अंकुश यांचे डोके डंपर मधे अडकून पुढे गेल्याचे समजले. पोलिसांकडून डोके मिळवण्यासाठी डंपरचा शोध सुरु होता.
घटनास्थळाचे दृश्य मन हेलवणारे होते. गाडीचे पुढील चाक तुटले होते. मेंदू इतस्ततः पडला होता. रुग्णवाहिका चालक साजन अवघडे,ओंकार डांगे यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवले. घटना स्थळी रक्ताचा सडा पडला होता.
या अपघाताच्या दृश्याने बघ्यांनी हळहळ व्यक्त केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा