![]() |
भगवान महावीर व डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त मार्गदर्शन करताना डॉ. महावीर अक्कोळे , डॉ.आर.डी.माने व प्राचार्य प्रा.डॉ.मनिषा काळे |
*प्रा. डॉ महावीर बुरसे : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथे भगवान महावीर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी स्थानिक व्यवस्थापन समितीचे सचिव डॉ.महावीर अक्कोळे यांनी भगवान महावीर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कसे प्रेरणादायी आहेत याबाबत सविस्तर विवेचन केले. या महान व्यक्तींच्या कार्यात तत्कालीन समाजातील अस्थिरता, जातीयवाद, वर्ण व्यवस्था यांचा परिणाम झालेला दिसून येतो. यामधूनच बहुजन समाजातील लोकांना योग्य दिशा देण्याचे कार्य या महान व्यक्तीनी केले आहे. जैन व बौद्ध धर्म हे विज्ञानवादी आहेत. तसेच हे धर्म कर्मकांड, पशुबळी व मूर्तिपूजा यांचा ते विरोध करतात. जैन समाज जीवनात भगवान महावीरांनी सांगितलेल्या जैन धर्मातील मूळ तत्वज्ञान कुठेतरी दुर्लक्षित होत असलेले दिसून येते असे प्रतिपादन त्यांनी केले.आपल्याला या समाजामध्ये परिवर्तन घडवून आणायचे असेल तर या दोन महान व्यक्तीने सांगितलेल्या तत्वज्ञानाची सुरुवात प्रत्येक व्यक्तीला स्वतःपासून करावी लागेल. जैन धर्मातील अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह व अनेकांतवाद याबाबत डॉ. अक्कोळे यांनी सविस्तर विवेचन केले.
प्रा.डॉ.आर.डी. माने यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न केला. डॉ.आंबेडकरांनी वेगवेगळ्या क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा त्यांनी सविस्तरपणे विशद केला. तसेच डॉ.माने यांनी मान्यवरांना डॉ. आंबेडकर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा उलगडा करणारी पुस्तके भेट दिली.
या कार्यक्रमाचे आभार प्र. प्राचार्य प्रा. डॉ.सौ. मनिषा काळे यांनी मानले. या कार्यक्रमाचे उत्तम व नेटके नियोजन नँक कॉर्डिनेटर प्रो.डॉ. टी. जी. घाटगे यांनी केले. या कार्यक्रमास प्रो.डॉ.एस.बी.बनसोडे, प्रा. आर.डी.तासगावकर, प्रो. डॉ. नंदकुमार कदम, ,सौ.एम.एस.पाटील ,पर्यवेक्षक श्री.बी.ए. आलदर, तसेच कार्यालयीन अधीक्षक श्री.संजीव मगदूम, एन.एस.एस.कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने व डॉ. के. डी. खळदकर,कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा