![]() |
जयसिंगपूरात क्लिनिकच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त शिबिराचे आयोजन : सुप्रसिद्ध डॉ.ममता बियाणी |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : पश्चिम महाराष्ट्रबरोबर जयसिंगपूर शहर व परिसरात नावाजलेलं व रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान निर्माण करणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे "रिकव्हरी अ फिजिओथेरपी क्लिनिकच्या" वतीने जयसिंगपूर शहरात ७ व्या वर्धापन दिनानिमित्त फिजिओथेरपीचे अल्पदरात चिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ. ममता बियाणी यांनी दिली.
अत्याधुनिक सेवाने सज्ज असलेल्या क्लिनिकच्या माध्यमातून कंबर,पाठ,मान,गुडघा, खांदा, मनगट, अशा असंख्य दुखण्यावर तसेच जास्त वेळ एका ठिकाणी बसता येतं नाही किंवा दहा मिनिटांपेक्षा जास्त उभा राहता येत नाही रुग्णांसाठी आनंदाची पर्वणी म्हणून हे क्लिनिक आपल्या सेवेत असल्याची माहिती डॉ.ममता बियाणी यांनी दिली. त्याचबरोबर शरीरातील हाडे,सांधेदुखी,मज्जातंतू, आणि स्नायूंच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना येथे उत्तम उपचार सुविधा मिळत आहेत. सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अल्पदरात, विनाशस्त्रक्रिया, औषधाशिवाय गुंतागुंतीच्या समस्यावर खात्रीशीर व यशस्वी उपचार मिळण्याचे एकमेव ठिकाण असल्याचे डॉ. ममता बियाणी म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या, गेल्या सात वर्षात या क्लिनिकच्या माध्यमातून शेकडो रुग्ण बरे होऊन त्यांच्या चेहर्यावर आनंद फुलविण्याचे काम केले आहे. हे सर्व येथे असलेल्या अत्याधुनिक अर्थात पश्चिम महाराष्ट्रातील पहिले रोबोटिक मशीन ज्याच्या द्वारे ही सेवा दिली जाते. या क्लिनिकमध्ये अत्यंत अल्प दरात शॉकवे थेरपी, क्लास आय व्ही लेसर जर्मन टेक्निक, तेसला इलेक्ट्रो मॅग्नेटिक थेरेपी, डिस्क वरबुलगे ट्रीटमेंट टेबल, न्यूरो रेहब व पीइएमफ या आजच्या आधुनिक थेरपी व मशीनच्या माध्यमातून रुग्णांना शतप्रतिशत बरे करण्याचे प्रयत्न केले जातात.
सदरचे शिबिर गुरुवार दि.१४,१५ व १६ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० ते २.०० व सायंकाळी ४.०० ते ८.०० या वेळेत ५ वी गल्ली, राधाबाई रोड (श्री स्वामी समर्थ मंदिरा जवळ) जयसिंगपूर येथे शिबिर आयोजीत केले आहे. तरी संबंधित घटकांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपले- आपल्या कुटुंबीयांची आयुष्य निरोगी व समाधानी बनवावे अशाप्रकारचा आवाहन या रिकव्हरी क्लिनिकच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा