Breaking

गुरुवार, १४ एप्रिल, २०२२

*बहुजनांची लढाई तीव्र करण्यासाठी एकत्रित येणे गरजेचे आहे - ना. डॉ. जितेंद्र आव्हाड*

 

"जयसिंगपूर येथे बहुजन हक्क परिषद संपन्न"


*करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी*


जयसिंगपूर  : राज्याचे गृहनिर्माण तथा अल्पसंख्यांक मंत्री ना. डाॅ. जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र आव्हाड युवा मंच, महाराष्ट्र प्रदेश व स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित "बहुजन हक्क परिषद 2022" जयसिंगपूर येथे संपन्न झाली या परिषदेला ना. डाॅ. जितेंद्र आव्हाड साहेब यांनी व्हिडिओकॉल द्वारे उपस्थितांना संबोधित केले. मा.आव्हाड साहेब म्हणाले की, शाहू महाराज यांच्या पावन भूमित बहुजनांनी एकत्रित आल्याचा मला आनंद आहे बहुजनांचा हक्काची लढाई तीव्र करायची असेल तर बहुजनांनी एकत्र होणे गरजेचे आहे शिवाय या परिषदेला त्यांनी शुभेच्छाही दिल्या. 

         जयसिंगपूर शहरातील राजर्षी शाहू महाराज यांचे जनक पिता जयसिंग महाराज व शाहू महाराज यांच्या पुतळ्याला हार घालण्यात आला. या परिषदेला प्रमुख वक्ते म्हणून आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक मा.दिगंबर सकट यांनीही बहुजनांच्या विविध प्रश्नावर मार्गदर्शन केले. बहुजनांच्या चळवळीत काम करणाऱ्या सुवर्णा विटेकरी यांनी महागाई वर कविता करून परिषदेला रंगत आणली. आशा वर्कर संघटनेचे अध्यक्ष नेत्रदीपा पाटील, स्वराज्य संस्थेचे सचिव ऐनापुरे, मालन शिंदे, निहाल शरीकमसलत, आप्पासाहेब बंडगर, प्रकाश ढाले आदींनी मनोगते व्यक्त केले या परिषदेचे आयोजन जितेंद्र आव्हाड युवा मंचचे सरचिटणीस मुबीन मुल्ला आष्टेकर व स्वराज्य सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष एजाज मुजावर यांनी केले.

      या कार्यक्रमाने बहुजनाच्या एकत्रीकरणाचा व विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा मुद्दा अधोरेखित झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा