*करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी*
शिरोळ : देशातील सर्व धरणाचे परिचलन हे केंद्रीय जल आयोगाच्या देखरेखीखाली केले जाते. त्यासाठी प्रत्येक धरणावर आयोगाचे अधिकारी स्वतंत्रपणे काम करत असतात आणि त्याचासाठी मार्गदर्शक सूचना घालून दिल्या आहेत. त्यामध्ये जून महिन्यांपूर्वी १० टक्के पाणीसाठा धरणात ठेवावा व जुलै अखेर ५० टक्यापेक्षा जास्त पाणीसाठा करू नये, असे सांगितले आहे. त्या मार्गदर्शक सूचनाचे कोयना,वारणा आणि अल्मट्टी धरणातील प्रशासनाने व्यवस्थितरित्या पालन केल्यास महापुराचा फटका बसणार नसल्याचे आंदोलन अंकुशचे अध्यक्ष मा.धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले. अब्दुललाट ता.शिरोळ येथे आंदोलन अंकूशच्या वतीने १ मे रोजी कुरुंदवाड घाट येथे होणाऱ्या पूर परिषदेच्या सभा घेण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा