Breaking

बुधवार, १३ एप्रिल, २०२२

*मिरजेत खाजगी सावकाराला केले जेरबंद ; पावणेतीन कोटीच्या मोबदल्यात आठ कोटीची मागणी*

 

मिरजेत खाजगी सावकारकी बोकाळली


*जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी*


मिरज : सोन्याच्या व्यवसायासाठी खाजगी सावकाराकडून घेतलेले दोन कोटी 83 लाख ७५ हजार रुपयांच्या बदल्यात साडे पाच कोटींची परतफेड करूनही आणखी आठ कोटी रुपयांची मागणी करून सोने व्यावसायिक राहिल शेख वय वर्षे ३६ राहणारे किल्ला भाग मिरज यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करीत महात्मा गांधी चौक पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांनी बांधकाम व्यावसायिक रफिक पटेल पिता पुत्रासह ६ सावकारावर गुन्हा दाखल झाला आहे. सावकारी प्रकरण उघड झाल्याने मिरज शहरातील खाजगी सावकारी बोकाळत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

        दरम्यान पोलिसांनी खाजगी सावकार रफिक पटेल यांच्या घराची झडती घेऊन तपास कामी काही महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. गुन्हा दाखल झालेल्या संशयित सावकार रफीक अहमद पटेल त्याचा मुलगा जीउ रफिक पटेल,अजमल पटेल, अभिजीत तासीलदार,मन्सूर मुल्ला,दिवाकर पोद्दार या पाच जणांचा समावेश आहे. पोलिसांनी संबंधित खासगी सावकारांच्या घराची झडती घेऊन बँक आणि इतर खाजगी सावकारी प्रकरणातील कागदपत्रे ताब्यात घेतली. पैशांच्या वसुलीसाठी सराफ व्यावसायिक राहिल शेख यांना वेळोवेळी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तसेच एक फ्लॅट काढून घेतल्याचे  फिर्यादीत म्हटले आहे. राहील शेख यांनी बांधकाम व्यवसायिक रफिक पटेल यांच्याकडून जिल्हा येथे फ्लॅट विकत घेतला होता. तेव्हापासून त्यांच्या मध्ये चांगले संबंध होते कोरोना कालावधीत सराफी व्यवसायात मंदी आल्याने त्यांनी रफिक पटेल, जउ पटेल आणि अभिजीत तासीलदार यांच्या कडून दहा टक्के व्याजदराने दोन कोटी ८३ लाख ७५ हजार रुपये घेतले होते. त्यांनी आतापर्यंत पाच कोटी २४ लाख ४० हजार रुपयांची परतफेड केली होती. मात्र अद्याप आठ कोटी रुपये येणे बाकी असल्याचे सांगून त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. रफिक पटेल यांनी किल्ला भागातील राहिल शेख यांचा एक फ्लॅट बळकावला आहे. तसेच त्यांना चार चाकी मध्ये बसवून निर्जन ठिकाणी नेऊन मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून राहिल शेख यांनी महात्मा गांधी चौक पोलिसात धाव घेतली आणि संबंधित विरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील रफिक पटेलसह चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले तसेच शिवाजीनगर येथील रफिक पटेल यांचा शिवाजीनगर येथील एका घराची झाडाझडती घेऊन महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा