![]() |
संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे व प्राचार्य प्रा.डॉ.सौ. मनिषा काळे |
*विक्रांत माळी : जयसिंगपूर प्रतिनिधी*
जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आजादी का अमृतमहोत्सव या अंतर्गत 'प्लॅस्टिक मुक्त परिसर 'अभियान राबविण्यात आले.
प्र. प्राचार्य,प्रा. डॉ. सौ.मनिषा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रभाकर माने व डॉ. के.डी.खळदकर यांच्या नेतृत्वाखाली प्रथम व द्वितीय वर्षातील स्वयंसेविकांना प्रबोधनात्मक घोषणांच्या व प्लॅस्टिक संकलनाच्या माध्यमातून ही मोहीम पार पाडण्यात आली.
जयसिंगपूर कॉलेजच्या २५ एकर परिसरामधील विविध स्वरूपातील प्लॅस्टिकचे संकलन करून राष्ट्रीय सेवा योजनाच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिकमुक्त परिसर मोहीम पार पाडली आहे. सर्व स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनीनी दिलेल्या योग्य सूचनेनुसार फुटबॉल मैदान परिसर, महाविद्यालय मेन गेट परिसर, कॅन्टीन, ग्रंथालय, क्रीडांगण परिसर, पार्किंग परिसर वसतीगृह परिसर, कला शाखा विभागासमोरील व महाविद्यालयातील उर्वरित परिसरातील प्लॅस्टिक बॅग, चॉकलेटचे विविध पद्धतीचे रेफर्स काचेच्या बाटल्या, प्लॅस्टिक पाईप, ग्लास, बिसलरी बाटल्या,प्लास्टिक चप्पल, दुधाच्या पिशव्या, आईस्क्रीम रेफर्स व अन्य स्वरूपातील १५ पोती प्लॅस्टिक कचरा गोळा केला गेला. कॉलेजमधील विविध घटकांनी सदर उपक्रमास भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केलं. सदर संकलित केलेल्या प्लास्टिक नगरपालिकेच्या स्वच्छता विभागास सुपूर्त करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
जयसिंगपूर कॉलेज स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे यांनी प्रत्यक्ष उपक्रमास भेट देऊन उपस्थित स्वयंसेवक विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शनाद्वारे प्रेरित केले. यावेळी प्रो.डॉ.एन.पी.सावंत,प्रो.डॉ.एस.बी.बनसोडे, कार्यालयीन अधिक्षक संजीव मगदूम.सौ.एस.जी.संसुद्धी,प्रा.एस.बी.डफळापुरकर,प्रा.डॉ.राजू कोळी,
प्रा.सौ.एस.जी.पाटील, प्रा. बी.ए. पाटील,प्रा.सौ. डी.एस.बामणे,प्रा. मेहबूब मुजावर, संजय चावरे, एस.के.शेटे,प्रदिप सुतार ,श्रीमती झेले मॅडम, श्रीमती कल्पना शेट्टी,एम.डी.कुंभार,अमित मगदूम, नेमिनाथ मगदूम, नलवडे सर ,जिनाप्पा कांबळे,जीवन आवळे,मनोहर धनवडे, विक्रांत माळी, नेहा राठोड, मगदूम, व इतर प्राध्यापक राष्ट्रीय सेवा योजनांचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर राष्ट्रीय सेवा योजनेच्या या उपक्रमाबाबत संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा