Breaking

शुक्रवार, ८ एप्रिल, २०२२

*नियोजनबद्ध अभ्यास,परिश्रम व चिकाटी ही त्रिसूत्री बँकिंग क्षेत्रात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली : प्रा.डाॕ.विजय कुंभार*

 

बँकिंग तज्ञ प्रा.डॉ.विजय कुंभार मार्गदर्शन करताना सोबत प्राचार्य डॉ.कांबळे


*प्रा.मेहबूब मुजावर : विशेष प्रतिनिधी*


 रुकडी : बँकिग क्षेत्रात  मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध आहेत पण पात्र उमेदवार मिळत नाही, त्यामूळे विद्यार्थ्यांनी किमान एक वर्ष स्पर्धा परीक्षेचा चांगला अभ्यास केला तर बँकेत नोकरी मिळू शकते. सरकारी किंवा खाजगी  बँकेत कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा मिळतात, पगार सुध्दा चांगला मिळतो असे मत धनंजयराव गाडगीळ काॕलेज सातारा येथील डाॕ.विजय कुंभार यांनी व्यक्त्त केले. तसेच नियोजनबद्ध अभ्यास,परिश्रम व चिकाटी ही त्रिसूत्री बँकिंग क्षेत्रात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली असल्याबाबतचा त्यांनी रुकडीच्या राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत आयोजित केलेल्या 'बँकिंग क्षेत्रातील रोजगाराच्या संधी' या विषयावरील  व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. प्रशांत कांबळे होते.

     या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक डाॕ.शर्मिला साबळे यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डाॕ.विजय देसाई यांनी करुन दिला.डाॕ.विजय कुंभार यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, परीक्षा पध्दती, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम या विषयी सविस्तर माहिती दिली.आभार श्री. संजय ओमासे यांनी मानले तर सुत्रसंचालन डाॕ. शंकर दळवी यांनी केले. या कार्यशाळेत श्री.विजयसिंह यादव महाविद्यालय पेठवडगाव क्लस्टर मधील महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा