Breaking

मंगळवार, ३ मे, २०२२

*जयसिंगपूर अ‍ॅड. बार असोसिएशनच्या द्विवार्षिक अध्यक्षीय निवडणूकीत अ‍ॅड.बी.बी.मगदूम यांना लागला विजयाचा गुलाल*


Adv. मा.बाळासाहेब मगदूम यांची अध्यक्षपदी निवड


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


  जयसिंगपूर ता.शिरोळ जि.कोल्हापूर येथे वकिल संघटनेची सन 2022 ते  2024 या द्विवार्षिक अध्यक्ष पदासाठी सोमवार दि.02/05/2022 रोजी निवडणूक पार पडली. अध्यक्षपदासाठी अ‍ॅड. तारक एफ. अत्तार आणि अ‍ॅड. बाळासाहेब बी.मगदूम या दोघांनी अध्यक्ष पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सदर निवडणूक चुरशीची असल्याने 97 टक्के मतदारांनी विक्रम मतदानाची नोंद केली. या अटीतटीच्या निवडणुकीत अ‍ॅड. बाळासाहेब भूपाल मगदूम हे विजयी झाले. या अगोदर अ‍ॅड. तारक एफ. अत्तार यांनी अध्यक्षपद भूषवून चांगली कामगिरी केली होती. पुन्हा आपलं नशीब आजमावत असताना नवनिर्वाचित अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब भूपाल मगदूम यांनी निसटता विजय मिळवला आहे.अखेर अध्यक्षपदाची माळ अ‍ॅड. बाळासाहेब मगदूम यांच्या गळ्यात पडली.

 

     जयसिंगपूर वकिल संघटनेच्या इतर पदासाठी झालेल्या निवडणुकीत सौ.उषा अभयकुमार पाटील यांची उपाध्यक्ष पदी, अ‍ॅड. भास्कर सुभाष माने यांची सेक्रेटरी पदी आणि अ‍ॅड. सुषमा धनंजय पाटील यांची महिला प्रतिनिधि म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. सदर निवडणूक प्रक्रियेत अ‍ॅड. शशिकांत निवृत्ती कोडोले यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर अ‍ॅड. गणेश रामहरी चादरे यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.सदर निवडून आलेल्या उमेदवारांना मा.जिल्हा न्यायाधीश कानडेसो यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

   सदर निवडून आलेल्या उमेदवारांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा