![]() |
जयसिंगपूर कॉलेजची जनजागृती बाईक रॅली |
*नृसिंहवाडी ते प्रयाग चिखली दरम्यान बाईक रॅलीचे आयोजन*
कोल्हापूर : जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने गुरुवार दिनांक २८ एप्रिल २०२२, रोजी आझादी का अमृत महोत्सव या अंतर्गत “प्रदूषणमुक्त पंचगंगा नदी अभियान” बाईक रॅली चे आयोजन दि.२८ व २९ रोजी श्री क्षेत्र नृसिंहवाडी ते प्रयाग चिखली या दरम्यान आयोजित केली होती. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी.टी.शिर्के,प्र.कुलगुरू प्रा. डॉ.पी.एस.पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन.शिंदे, शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेच्या कक्षाचे संचालक प्रा. अभय जायभाये व कॉलेजचे प्र.प्राचार्य प्रा. डॉ. मनिषा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या अभियानाची सुरुवात श्री क्षेत्र नृसिंहवाडीच्या कृष्णा पंचगंगा संगमापासून पासून सरपंच सौ. कुंभार मॅडम यांच्या हस्ते रॅलीला सुरुवात झाली. प्रारंभी प्रदूषण मुक्तीच्या घोषणा देत गावामध्ये जनजागृती बाईक रॅली काढण्यात आली. यानंतर ही रॅली नृसिंहवाडी - कुरूंदवाड- भैरववाडी शिरोळ धरणगुती - नांदणी- हरोली - जांभळी - टाकवडे - इचलकरंजी कबनूर रुई तिळवणी साजणी रुकडी गांधीनगर - कोल्हापूर - आंबेवाडी व प्रयागचिखली या गावांमधून ही बाईक रॅली जात असताना या रॅलीदरम्यान सदर गावातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य,पोलिस पाटील, ग्रामसेवक व पर्यावरणप्रेमी गावकऱ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या नदी प्रदूषणमुक्त जनजागृती रॅलीचे स्वागत केले. रॅलीमध्ये विशेष करून धरणगुत्तीचे मा. शेखर पाटील , नांदणीचे सरपंच सौ.संगीता तगारे मॅडम व तिळवणीचे कदम यांनी गावामध्ये छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करून या रॅलीला बळ दिले. कोल्हापुरात महाराणी ताराराणी पुतळा चौक व दसरा चौकात छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करीत त्याठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला.
सदर रॅलीच्या दरम्यान प्रदूषण मुक्तीचा जागर, स्वातंत्र्यसेनानी अभिवादन करण्यासाठी देशभक्तीचं जाज्वल्य निर्माण करण्यासाठी देशभक्तीपर गीतांचा कार्यकम त्याचबरोबर ९ गावातील पंचगंगा नदीच्या पात्रातील पाण्याचे संकलन करून पाण्यातील शुद्धता मोजण्यासाठी पाण्याचे नमुने घेण्यात आले. सरतेशेवटी या अभियान रॅलीचा समारोप पंचगंगा नदीचा उगम अर्थात चिखली येथे झाला.
सदर अभियान कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने व डॉ.खळदकर यांच्या नेतृत्वाखालील रॅलीत ५० स्वयंसेवक विद्यार्थी सहभागी होते.प्रा आप्पासाहेब भगाटे, इचलकंजी नाईट कॉलेजचे प्रा.मुंडकर,प्रा. मेहबूब मुजावर व प्रकाश कदम यांचे विशेष सहकार्य लाभले. क्षेत्र नृसिंहवाड पंचगंगा संगमापासून ते प्रयाग चिखली उगमापर्यंतचा ही रॅली यशस्वीपणे संपन्न झाली.या अभियानाचे व उपक्रमाबाबत विविध घटकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा