![]() |
शाहू आर्मी कडून लोकराजाला अभिवादन |
*भोलू शर्मा : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : मातोश्री सोशल फाउंडेशन संचलित, शाहू आर्मी या आपत्ती व्यवस्थापन तुकडीची स्थापन करण्यात आली आहे. याच तुकडी कडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या १०० पुण्यतिथीदिनी ६ मे २०२२ रोजी, जयसिंगपूर येथील क्रांति चौकातील राजश्री शिवछत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर सकाळी १०:०० वाजत १०० सेकंद स्तब्ध उभे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी शाहू आर्मी मधील स्वयंसेवकान मध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
यावेळी मातोश्री सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष व शाहू आर्मीचे संस्थापक जीवन आवळे,जय हिंद न्युज नेटवर्कचे संपादक डॉ.प्रभाकर माने, मातोश्री सोशल फाउंडेशनचे उपाध्यक्ष अर्जुनसिंग रजपूत, सचिव सुशांत चुडाप्पा, खजिनदार रमेश घाटगे, सदस्य किसन भोसले, उमेश पवार, ओंकार कोळी, झहीरखान मोकाशी, अजय पाटील, विवेक कांबळे, तेजस राठोड, सत्यजित माने, बिरेश खांडेकर, गौरव पाटील, श्रुति यादव, आकांशा शिरोळकर, दिव्या रासुरे, निकिता सातपुते इत्यादि उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा