![]() |
मिस्त्री परिवारातील पुरोगामी विवाह |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
शिरोळ : मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित मिस्त्री घराण्यात वहिणीशी एका सख्या दिराने विवाह करून शिरोळच्या ऐतिहासिक नगरीत पुरोगामी विचार रुजविण्याचा व एक नवा इतिहास घडवण्याचा प्रयत्न केला आहे. याकामी दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्यात त्यांना यश आले.
शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक कालवश युसूफ भाई मिस्त्री यांचे नातू दत्त साखर कारखान्याचे संचालक कालवश अंजुम मिस्त्री यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते. मृत्यूसमयी त्यांना तीन महिन्याचे बाळ होते.त्यांची पत्नी सानिया यांना मिस्त्री परिवारातील सदस्यांनी आपुलकीने सांभाळ करीत होते. ऐन तारुण्यामध्ये अंजुम यांचे निधन झाल्याने त्यांची पत्नी सानिया व लहान बाळाचे कसे होणार या विवंचनेत असतानाच अंजुमचे लहान भाऊ मंजूर याने आपली विधवा भावजय श्रीमती सानिया यांच्याशी विवाह करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. याकामी दत्त साखर कारखान्याचे चेअरमन अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी पुढाकार घेऊन वडील रहीम मिस्त्री,आई जहीरा मिस्त्री,मुलीचे वडील मौलाना मोहम्मद शेख, मुलीची आई आयशा शेख यांच्याशी सल्लामसलत केला विवाह संमती दिल्यानंतर काल सायंकाळी सहा वाजता मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे विवाह संपन्न झाला या विवाह सोहळ्यास शुभ आशीर्वाद देण्यासाठी भाजपचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव, फत्तेलाल मिस्त्री ,परवेज मिस्त्री व मिस्त्री परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्याने पुरोगामी विचार व कृतीचा आदर्श यानिमित्ताने समाजासमोर ठेवला आहे.
मिस्त्री परिवाराच्या पुरोगामी विचारसरणीला सलाम!
उत्तर द्याहटवा