Breaking

शुक्रवार, ६ मे, २०२२

*जैनापूरच्या कुमार विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांचे 'ऋणानिबंध टॅलेंट सर्च' या परीक्षेत उज्वल यश*


जैनापुरच्या मराठी शाळेतील यशस्वी विद्यार्थी


*प्रा. मेहबूब मुजावर :  जैनापूर प्रतिनिधी*


जैनापूर : मार्च 2020 मध्ये  ऋणानिबंध  टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यात आलेल्या प्राथमिक शाळा मध्ये कुमार विद्या मंदिर जैनापूर तालुका शिरोळ च्या शाळेने उज्वल यश प्राप्त केले आहे. प्राथमिक परीक्षेत आणि पूर्वपरीक्षेत विद्यार्थ्याने उत्कृष्ट प्रमाणे यश प्राप्त केले आहे. 

कुमार विद्या मंदिर मधील विद्यार्थी १)वेदांत रतन आडसुळे ,हा विद्यार्थी जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.

२) श्रेयस संजय कांबळे, हा विद्यार्थी जिल्ह्यात सातवा क्रमांक पटकावला आहे. 

३) सुप्रिया मनसुर मुजावर , या विद्यार्थिनींनी तालुक्यात पाचवी क्रमांक या परीक्षेत पटकाविलेला आहे. 

४) श्रुती श्रीकांत माळी ,या विद्यार्थिनीने जिल्ह्यात सातवी क्रमांकाने पटकावलेला आहे.

५)आदित्य अमोल कुंभार हा विद्यार्थी तालुकास्तरीय पाचवा क्रमांक मिळवला आहे. 

६)गर्गी दिपक जाधव ही विद्यार्थिनी तालुकास्तरीय पाचवा क्रमांक पटकावला आहे.

 ७) तबस्सुम तोफिक मुजावर विद्यार्थिनीने संपूर्ण केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

   सदर यशस्वी विद्यार्थ्यांना  मार्गदर्शनासाठी इयत्ता पहिली पासून ते चौथी पर्यंत सौ. उषा सुतार ( कु. वि.म. जैनापुर  मुख्याध्यापिका ) श्री. संजय कांबळे , सौ. धनवडे मॅडम, सौ पाटील मॅडम या शिक्षकांनी बहुमोल मार्गदर्शन केले.

  सदर यशस्वी विद्यार्थ्यांचा जैनापुर व पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामस्थांनी भरभरून अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा