Breaking

मंगळवार, १७ मे, २०२२

*कवठेमंहाकाळ/करोली (टी) चे सुपुत्र प्रा.अमोल महाजन यांना शिवाजी विद्यापीठाची भूगोलशास्त्र विषयातून पीएच.डी. प्रदान*


प्रा. अमोल महाजन व प्रा. डॉ. ए.ए.पुजारी


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : हातकणंगले येथील मा.श्री.अण्णासाहेब डांगे महाविद्यालयातील भूगोलशास्त्र विभागातील प्रा.अमोल सदाशिव महाजन यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी.पदवी प्रदान करण्यात आली.प्रा.महाजन यांनी  "SPATIO TEMPORAL CHANGES IN AGRICULTURAL PRODUCTIVITY IN SANGLI DISTRICT: A GEOGRAPHICAL ANALYSIS” (1991-2018) (स्पॅसिओ टेम्पोंरल चेंजिस इन ॲग्रीकलचरल प्रोडोकटीव्हीटी इन सांगली डिस्ट्रिक्ट:अ जॉग्राफिकल अनॅलीसिस) या विषयावर म्हणजेच सांगली जिल्यातील कृषी उत्पादक्तेचा स्थळ काळ सापेक्ष बदल यावर प्रबंध सादर केला होता. प्रा.महाजन यांना *जयसिंगपूर महाविद्यालयाचे माजी भूगोल विभागप्रमुख प्रोफेसर.डॉ.ए.ए.पुजारी* यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळेस पार पडलेल्या Open Defence Viva voce वेळी चेअरमन म्हणून शिवाजी विद्यापीठ भूगोलशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉ.जे.बी.सपकाळे,बहिस्थ परीक्षक म्हणून औरंगाबाद विद्यापीठाचे भूगोलशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.मदनलाल सूर्यवंशी उपस्थित होते.

     प्रा.अमोल महाजन यांनी यु.जी.सी.नवी दिल्ली अंतर्गत (W.R.O. पुणे, २.३२ लाख रु.) *कवठे महांकाळ तालुक्यावर लघु संशोधन प्रकल्प* पूर्ण केला आहे. सदरच्या पीएच.डी. संशोधनामध्ये प्रा.महाजन यांनी सांगली जिल्ह्यातील शेतीची उत्पादकता,तालुक्यानुसार जलसिंचन,सुधारित बियाणे,रासायनिक खते,ट्रॅक्टराझेशन,इलेक्ट्रिक पंप सेट,बँकिंग सुविधा,मार्केट सेंटर,वाहतूक या इंडिकेटर्सचा वापर करून सांगली जिल्ह्याची तालुक्यानुसार शेतीची उत्पादकता व स्थिती या संदर्भात सूक्ष्म अभ्यास केला आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील दोन गावे अशी दहा तालुक्यातील वीस गावांतील कृषीचा सूक्ष्म अभ्यास करताना सुमारे ६०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या मुलाखती (शेड्युल्ड) भरून घेतल्या होत्या. 


    सांगली जिल्ह्यातील शेतजमिनीचा १९९१-२०१८ या कालावधी मधील सांगली जिल्ह्यातील तालुक्यानुसार पीक पद्धतीत झालेला बदल,विविध पिकाखालील क्षेत्र व बदल,पीक सहयोग (पीक सहचर्य), पीक विकेंद्रीकरण, मुख्य पिकांचे उत्पादन,उत्पादकता या सर्व घटकांची १९९१-२०१८ मधील बदलाची स्थिती,बँक-पतसंस्था सुविधा,कृषी उत्पादक बाजार समिती, दुय्यम बाजार समिती, आठवडा बाजार,अभ्यासात घेतलेल्या गावानुसार गहू,ज्वारी,मका,कडधान्य,भुईमूग, सोयाबीन,ऊस,फळे व भाजीपाला इ.पिकांचा अभ्यास सूक्ष्म पद्धतीने केला आहे. 


     प्रा. अमोल महाजन यांचे प्राथमिक शिक्षण करोली (टी) येथे व माध्यमिक शिक्षण श्री.महांकली हायस्कूल कवठे महांकाळ,पुढे महाविद्यालयीन शिक्षण पी.व्ही.पी. महाविद्यालय कवठे महांकाळ येथे,एम.ए./एम.एस.सी. शिक्षण भूगोलशास्त्र विभाग,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर,बी.एड. शिक्षण के.टी.एच.एम.कॉलेज नाशिक,एम.ए.(अर्थशास्त्र) दूरशिक्षण विभाग,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर. तसेच ते यू.जी.सी.दिल्ली अंतर्गत होणाऱ्या नेट परीक्षा २००९ मध्ये उत्तीर्ण आहेत. प्रा.अमोल महाजन यांच्या अध्यापनाची सुरुवात पी.व्ही.पी. महाविद्यालय कवठे महांकाळ येथून झाली.त्यांना या ठिकाणी जुनिअर व सीनिअर विभागामध्ये दोन वर्षे अध्यापनाची संधी मिळाली. सध्या ते मा.श्री.अण्णासाहेब डांगे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हातकणंगले येथे भूगोलशास्त्र विभागामध्ये सन २०१० पासून पूर्णवेळ प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. प्रा.अमोल महाजन यांचे पिताश्री श्री.महांकली हायस्कूल कवठे महांकाळ येथून सेवानिवृत्त झाले आहेत. तर मातोश्री अंगणवाडी पर्यवेक्षिका पदावरून पंचायत समिती कवठे महांकाळ येथून सेवानिवृत्त झाले झाल्या आहेत.

      त्यांच्या बोलक्या स्वभावाने व कर्तुत्वाने अनेक मायेची माणसे जोडली असल्याने त्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रा.महाजन यांचा सत्कार ज्येष्ठ नेते, माजी मंत्री व संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.अण्णासाहेब डांगे (आप्पा) यांच्याहस्ते करण्यात आला. संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव ॲड.राजेंद्र डांगे,खजिनदार विठ्ठलराव मुसाई,व्यवस्थापक श्री.सुनील शिनगारे तसेच तासगाव-कवठे महांकाळचे युवा नेते मा.श्री.रोहित आर.आर.पाटील (दादा),जनता शिक्षण संस्थेचे श्री.महांकाली हायस्कुल कवठे महांकाळचे सचिव/चिटणीस मा. श्री.अशोकराव जाधव (बापू) यांच्या हस्ते संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्कार करण्यात आला.जयसिंगपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष मा.श्री संजय पाटील-यड्रावकर,शिरोळ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.दत्तात्रय बोरीगीड्डे, कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगरसेविका व प्रा.अमोल महाजन यांच्या लहान भगिनी श्री.व सौ.अनिता प्रशांत खाडे व श्री.खाडे गुरुजी (आण्णा), मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती श्री. प्रदीपराव खांडेकर,मंगळवेढा नगरपंचायतीचे नगरसेवक श्री.सुहास पवार,जयसिंगपूर नगरपरिषदेचे नगरसेवक श्री.राहुल बंडगर,ॲड.श्री.सचिन शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पी.एचडी.संशोधन करत असताना त्यांना आई-वडील,पत्नी,मुले,बंधू यांचे प्रोत्साहन व सहकार्य लाभले. 

       शिवाजी विद्यापीठ भूगोलशास्त्र विभागप्रमुख व अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रोफेसर डॉ.एस.डी.शिंदे, तसेच माजी भूगोलशास्त्र विभागप्रमुख प्रोफेसर डॉ.सचिन पन्हाळकर,प्रोफेसर डॉ.एस के पवार यांचे प्रा.अमोल महाजन यांना संशोधनामध्ये वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले.डॉ.डी.एच.पवार, डॉ.धनश्री शिंदे,डॉ.प्रशांत पाटील,डॉ.दंडपत सर,डॉ.मीना पोतदार,डॉ.विद्या चौगुले,भूगोलशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा.डॉ.बी.एस.जाधव,डॉ.नितीन सावंत,फिजिक्स अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा.डॉ.सचिन पवार,डॉ.प्रशांत यादव, प्रा.डॉ.प्रभाकर माने,प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी, प्रा.दिगंबर कुलकर्णी, प्रा.वरेकर सर,श्री.दीपक धनवडे,श्री.अनिल मोहिते सर,महाविद्यालयाचा सर्व स्टाफ, कवठे मंहाकाळ ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य श्री.सुधीर सपकाळ, श्री.जी.जी.पाटील सर,श्री.राजेश गायकवाड,श्री.सातपुते सर,श्री.दत्तात्रय चव्हाण (बी.के.अँड सन्स),आमचे मित्र श्री.सतीश कांबळे,श्री.गणेश लाड सर यांनी प्रत्यक्ष भेटून प्रा.अमोल महाजन यांचा सत्कार केला.

     भूगोल अभ्यासक, विद्यार्थीप्रिय,संविधानाला दैवत मानून पुरोगामी विचारांवर स्वार होऊन अखंड मानवतेची सेवा करणारे, सामाजिक व मानवी संवेदनशीलता जपत विविध प्रकारची कामे करून राष्ट्रीय कार्य करणारे, उत्तम बोलके व प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून सुपरिचित आहेत. उक्तीला कृतीची जोड देऊन संशोधनाच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले आहेत.

   भूगोल प्रेमी व आपल्या सर्वांचे स्नेही 'प्रा. डॉ. अमोल महाजन यांनी 'भूगोल' विषयातील 'पीएच.डी. पदवी संपादन केलेबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन । पुढील गुणवत्तापूर्ण व संशोधनात्मक शैक्षणिक प्रवासासाठी मनस्वी शुभेच्छा !!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा