Breaking

बुधवार, १८ मे, २०२२

*आदर्श युवा समाजभूषण पुरस्काराने सन्मानित श्री. विठ्ठल पाटील*


विठ्ठल पाटील आदर्श युवा समाज भूषण पुरस्कार स्वीकारताना

*प्रा. चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*


शिरोळ : आदर्श फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीने शिरोळ येथील मा. श्री  विठ्ठल सूर्यकांत पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श युवा समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरम्यान यावेळी यशोगाथा विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले, कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक सभागृहात सोमवारी हा कार्यक्रम पार पडला,.

         आदर्श फाउंडेशन तर्फे पर्सन ऑफ द ईयर आयोजित शानदार पुरस्कार वितरण सोहळ्यात इस्लामपूरचे माजी आमदार भगवानराव साळुंखे , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या जयश्रीताई सावर्डेकर, डीएनएसपी कंपनीचे संस्थापक अमोल निकम,सिनेअभिनेते विशाल काळे , दगडू माने यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन श्री पाटील यांचा गौरव करण्यात आला, स्वागत राजेंद्र प्रधान यांनी तर प्रास्ताविक आदर्श फाउंडेशन संस्थेचे प्रमुख विजय लोहार यांनी केले.

     यावेळी माजी आमदार साळुंखे व अमोल निकम यांनी आदर्श फाउंडेशन संस्थेच्या कामाचे कौतुक करून समाजातील गोरगरीब दुर्लक्षित घटकाचे दुःख कमी करण्यासाठी योगदान द्यावे, समाज चांगल्या कामाचे कौतुक करतो, त्यासाठी झोकून देऊन काम करा, विरोध करणारे नमस्कार नाही  ही  तर मुजरा करतील असेही त्यांनी सांगितले, 

    या समारंभास मीरा शिंदे, अनिता पाटील, भूमिका बेरगळ, श्रीमंत पाटील ,अमोल निकम, प्रताप शिंदे ,विजय लोहार , वनिता लोहार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन निशा लोहार यांनी केले, 

         विठ्ठल पाटील यांनी गोरगरीब, उपेक्षित अशा सामान्य माणसाच्या लोकाभिमुख सेवेतून केलेले काम कौतुकास्पद आहे, समाजातील विविध प्रश्नांच्या न्यायिक लढ्याबरोबर त्यांनी युवकांचे उत्कृष्ट संघटन केले आहे, शिरोळ नगरपरिषदेचे नगरसेवक म्हणून त्यांना संधी प्राप्त झाली, तालीम प्रेमीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील हे दत्त उद्योग समूहाचे शिल्पकार माजी आमदार स्व. सा.रे. पाटील फौंडेशनचे संचालक, माऊली सहकारी गृहतारण संस्थेचे संस्थापक चेअरमन असून रोटरी क्लब ऑफ शिरोळ संस्थेचे सदस्य म्हणून सामाजिक सेवा कार्यात त्यांचा विशेष सहभाग आहे,  कोरोना व महापूर परिस्थितीत आरोग्य तपासणी, वाढत्या कोरोनाला आळा घालण्याकरिता  मास्क, सॅनिटायझर वाटप तसेच जनआरोग्य  प्रबोधन कामी विठ्ठल पाटील यांचे महत्वपूर्ण कार्य आहे, या विशेष कार्याची दखल घेऊन आदर्श फाउंडेशन संस्थेने त्यांना पुरस्काराने सन्मानित केले,

,,,,,,,,,,,,,,,,,,,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा