![]() |
प्रा. डॉ.उल्हास माळकर व मा. दिनकर पाटील |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
मिरज : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्याच्या पूर्व भागातील प्रगतीपथावर असणारी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी,सोनी यांची पंचवार्षिक निवडणूक पूर्ण झाली. या निवडणुकीत उत्तम कर्तृत्व व नेतृत्व असणारे बहुआयामी व्यक्तिमत्व प्रो.डॉ. उल्हास महादेव माळकर हे इतर मागासवर्गीय गटातून मोठ्या मताधिक्याने दणदणीत विजयी झाले.
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना त्याचवेळी मिरज तालुक्यातील सोनी गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचाही अमृतमहोत्सव साजरा होत आहे.या सोसायटीने गेल्या ७५ वर्षात शेतकरी घटक केंद्रबिंदू मानून त्याच्या चौफेर विकासासाठी विविध स्वरूपाची कर्ज देऊन हित जोपासण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.मात्र याचं श्रेय पहाडी नेतृत्व, दातृत्व असणारे व सभासदांचा हितार्थ कार्य करणारे अर्थात जिल्ह्याला सुपरिचित असणारे भारदस्त व्यक्तिमत्व व सांगली जिल्ह्या मार्केट कमिटीचे सभापती सभापती मा. दिनकर पाटील यांच्या कुशल नेतृत्व व मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास पॅनलने १३ विरुद्ध 0 असा दणदणीत विजय प्राप्त करीत विरोधी पॅनलला भुईसपाट केले.
अत्यंत ग्रामीण भागातून सोनी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने ऑडिट ग्रेड 'A' प्राप्त केला असून वार्षिक नफा ₹ ७० लाख आहे. सदर सोसायटी ही दर वर्षी १५ टक्के लाभांश देते. सध्या सोसायटीचा वार्षिक उलाढाल ही ₹ २५ कोटींची आहे. त्याचबरोबर ९७ टक्के कर्ज वसुली झाली आहे. या सोसायटीने जवळपास १५ कोटी रकमेचे शून्य व्याजदराने शेतकरी घटकांना कर्ज दिले असून शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांच्या विकासासाठी ही सोसायटी सर्वतोपरी सक्षम आहे. यामुळेच सभासदाने या शेतकरी विकास पॅनलवर विश्वास ठेवीत विरोधी पॅनलला पराजित केले आहे.
मा.दिनकर पाटील व निवडून आलेल्या सर्व संचालक मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या पॅनलच्या सर्व सभासदांना विजयी केल्याबद्दल सर्व सभासद मतदारांचे आभार ही या पॅनल करून व्यक्त केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा