*प्रा. मेहबूब मुजावर : जैनापूर प्रतिनिधी*
जैनापूर : कुमार विद्या मंदिर , जैनापुर येथील जि. प. मराठी शाळेत चिमुकल्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कला अविष्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन जैनापूर गावचे सरपंच मा.सौ. संगीता रा. कांबळे तसेच माजी जि. प. सदस्य मा.श्री सर्जेराव शिंदे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. अनिल उमासे विस्तार अधिकारी, केंद्रसंचालक चिपरी, अनिल खिरले,उपसरपंच मा .श्री.आनंद बिरंजे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. सौ तनुजा मुजावर व व सर्व सदस्य, ग्रामसेवक श्री. आर.आर.कोळी ग्रामपंचायत सदस्य, उपस्थित होते.
चिमुकल्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सदाबहार गीत गायन व कला अविष्कार सादर करीत प्रेक्षकांना खिळवून ठेवले. कार्यक्रम यशस्वीते साठी मुख्याध्यापिका मा.सौ. उषा सुतार , उपमुख्याध्यापक मा.संजय कांबळे , शिक्षिका , सर्व कर्मचारी यांच्यासह सहकार्य करणारे ज्येष्ठ नागरिक ,सर्व ग्रुप मंडळ यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमाने प्रेक्षक व पालक वर्ग आनंदाने भारावून गेला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा