Breaking

सोमवार, १६ मे, २०२२

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज -द रियल सुपरहिरो सन्मान ! द्वितीय सत्र सत्कार सोहळा संपन्न





       कोल्हापूर : शनिवार, दिनांक १४ मे २०२२ रोजी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी आणि छत्रपती संभाजीराजे जयंती निमित्त  'राजर्षी छत्रपती शाहू महाराज -द रियल सुपरहिरो सन्मान!' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

        कोरोना काळामध्ये स्वतःचे कुटुंब,स्वतःची जिवाची पर्वा न करता मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म मानून कार्य केलेल्या व्यक्तींप्रती त्यांचा सन्मानपत्र देऊन व लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा भेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

       या कार्यक्रमामध्ये प्रा.डॉक्टर  सौ. स्मिता सुरेश गिरी, एन एस एस विभाग सल्लागार समिती सदस्य शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या अध्यक्ष आणि कवी व लेखिका शर्मिष्ठा ताशी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. 



       त्यांच्या हस्ते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.  सौ. ताशी मॅडम यांनी समाज कार्यातील शाहू महाराजांचे कार्य विषद केले तर अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. स्मिता गिरी यांनी सद्य स्थिती, राजकारण, पर्यावरण, पाणी व्यवस्थापन, विधवा पुनर्विवाह, कसदार शेतकरी  यांचे महत्व आणि शाहू महाराजांची दूरदृष्टी यावर मार्गदर्शन केले. दत्तक शेतकरी या विषयी ही भाष्य केले.

               विविध क्षेत्रातील सन्मानित केलेली  मान्यवरांची नावे खालील प्रमाणे.........

 *1) मा.डॉ. प्रियदर्शिनी चोरगे* 

सदस्य : बाल न्याय मंडळ

 *2) मा. स्वाती शाह* 

महिला सक्षमीकरण 

सामाजिक कार्यकर्त्या

 *3) मा. स्मिता काटवे* 

राष्ट्रीय /आंतरराष्ट्रीय 

जलतरणपटू

 *4) मा. रीना सौदडे* 

 परिचारिका

 *5) मा. मनिषा मोरे* 

आशा वर्कर

 *6) मा. मनिषा गावडे* 

अंगणवाडी सेविका

 *7) मा. सुनील कांबळे* 

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन 

पथक प्रमुख

 *8) मा. सरदार कांबळे* 

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन

 *9) मा. चंद्रकांत डोंगळे*

अध्यक्ष/संस्थापक 

महाराष्ट्र पोलीस सेवा संघटना

 *10) मा. सतिश सूर्वे* 

महाराष्ट्र पोलीस

 *11) मा. नामदेव नागतीले* 

सामाजिक कार्यकर्ते

 *12) मा. पप्पू साठे* 

 मूक जीवदया प्रेमी

 *12) मा. शमुवेल सौदंडे* 

राष्ट्रीय खेळाडू / प्रशिक्षक

क्रीडा शिक्षक / सामाजिक कार्यकर्ते

 *13) मा. बाळासो भराडे* 

माजी सरपंच 

सामाजिक कार्यकर्ते

 *14) मा. संजय पाटील* 

सामाजिक कार्यकर्ते

 *15) मा. अश्विनी माळवी* 

प्ले ग्रुप स्कूल शिक्षिका

सामाजिक कार्यकर्त्या

 *16) मा. अनिकेत देशमुख* 

सामाजिक कार्यकर्ते

 *17) मा. दत्तात्रय पाटील* 

उद्योजक

 *18) मा. सुमित्रा पाटील* 

उद्योजिका

 *19) मा. अमोल कांबळे* 

स्वच्छता दुत

 *20) मा. हर्षल कदम* 

आरोग्य सेवक

 *21) मा. सुमित माळवी* 

बाल निवेदक

       या कार्यक्रमांमध्ये संजय पाटील बाळासो भराडे व इतर मान्यवरांनी आपल्या कार्यास संदर्भात मनोगत व्यक्त केले. सर्व मान्यवरांना सन्मानपत्र व छत्रपती राजश्री शाहू ची मूर्ती भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

       कार्यक्रमाचे आयोजन डॉ. मॅडी तामगावकर, अध्यक्ष : डीआयडी फाउंडेशन साहिल भारती. फिल्म अँड डान्स कोरिओग्राफर - उदय देसाई यांनी केले होते.

       आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक तसेच सचिव युवा स्पोर्ट्स उमेश पाटील, अनिल माळवी - सचिव रामदास आठवले प्रतिष्ठान,  महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सर्व मान्यवरांना सन्मानपत्र बहाल करण्यात आली

       कार्यक्रमाचे आभार आशिष कदम,- अध्यक्ष  रामदास आठवले प्रतिष्ठान, क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी मानून कार्यक्रमाची सांगता केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा