![]() |
यादवनगर मधील तरुण चोरट्यास केली अटक |
*प्रविणकुमार माने : उपसंपादक*
जयसिंगपूर : फिर्याददार अलका सचिन शिंदे यांच्या बंद घरातून यांचा १९ हजार ५०० रुपयांचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना गुरुवारी रात्री घडली होती. कॉन्स्टेबल रोहित डावाळे व वैभव सूर्यवंशी यांनी सीसीटीव्ही फुटेज च्या माध्यमातून तपास करून २४ तासांत संशयित आरोपी अंकित भारत खांडेकर (वय वर्ष १९, रा.यादवनगर जयसिंगपूर) यास ताब्यात घेतले.
पोलीसी खाक्या दाखवताच त्याने मोबाईल चोरल्याची कबुली दिली आहे. खांडेकरकडून सदर मोबाईल हस्तगत केला असून पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद वाघ, नाईक असलम मुजावर, कॉन्स्टेबल रोहित डावाळे व वैभव सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.
जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या या चतुर कारवाईने संशयित आरोपीस अटक केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा