Breaking

शनिवार, १४ मे, २०२२

*गारगोटीतून दिवसाढवळ्या ११ लाखांचे दागिने लंपास*



*प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*


गारगोटी :  कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथील इंजुबाई कॉलनीतील घरातून दिवसाढवळ्या ११ लाख रुपये किमतीचे २१ तोळे सोन्याचे दागिने लंपास झाल्याची माहिती समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

       अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार अमोल जनार्दन देसाई यांनी कार्यक्रमासाठी बुधवारी (दि. ११ मे रोजी) बँकेच्या लॉकरमधून दागिने काढून बेडरूममधील टेबलवर ठेवले होते.पाऊस आल्याने घराबाहेर वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी त्यांची आई साधना बाहेर गेल्या. त्याचवेळी चोरट्याने घरात प्रवेश करून आठ बांगड्या, दोन बिल्वर, दोन ब-सलेट, आठ अंगठ्या असा सुमारे ११ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. गारगोटीत बुधवारी आठवडी बाजार असल्याने शहरात गर्दी होती. चोरट्यांनी बँकेपासून घरापर्यंत पाळत ठेवून सोने लंपास केल्याचा संशय आहे.

     या घटनेने परिसरात खळबळ माजली असून दिवसाढवळ्या या  चोरीने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा