![]() |
सुप्रसिद्ध लेखक मा. गिरीश मोरे मार्गदर्शन करताना |
*डॉ. महावीर बुरसे : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथे ६ मे रोजी राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सकाळी ठिक १०.०० वाजता महाविद्यालय परिसरात १०० सेकंद स्तब्ध राहून लोकराजाला वंदन करण्यात आले.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रो.डॉ. गिरीष मोरे यांनी 'राजर्षी शाहू जीवन कार्य' या विषयावर आपल्या अभ्यासपूर्ण व ओघवत्या मनोगतामध्ये राजर्षी शाहू महाराजांचा संपूर्ण कार्यकाल स्पष्ट केला.आपल्या मनोगतामध्ये १८७४ ते १९२२ पर्यंतचा राजर्षी शाहू महाराजांचे कार्य सविस्तरपणे विशेद केले. यामध्ये महाराजांचा राज्यारोहण, तलाठ्याची नेमणूक, दुष्काळ व प्लेग कालखंडात केलेले विशेष कार्य, धरणांची व बंधाऱ्यांची निर्मिती, वेगवेगळ्या समाजासाठी सुरू केलेले वसतिगृहे, प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था, शिष्यवृत्या आदीबाबत मांडणी करत साक्षात महाराजांचा इतिहास सर्वांसमोर उभा केला.
याप्रसंगी इयत्ता १२वी. विज्ञान शाखेमधील विद्यार्थीनी *कु.प्रेरणा विनोद भाट* हिने लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष २०२२ निमित्त आज घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये एकूण १५० पैकी १२१ गुण मिळवत *तृतीय क्रमांक* पटकावले बद्दल सत्कार करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य प्रा.डॉ. मनिषा काळे यांनी राजर्षी शाहू महाराज यांनी केलेल्या कार्याचा आढावा थोडक्यात विशद केला.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक प्रो.डॉ. तुषार घाटगे यांनी केले.प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा.संतोष डफळापुरकर यांनी आपल्या विशिष्ट शैलीमध्ये केले. कार्यक्रमाचे आभार प्रो.डॉ.एन.एल. कदम यांनी केले. याप्रसंगी प्रो.डॉ.एस.बी.बनसोडे, प्रा.आर.डी.तासगावकर, ज्युनियर विभागाचे पर्यवेक्षक प्रा.भारत आलदर, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी, ग्रंथालय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अत्यंत सुंदर व वास्तववादी मांडणी करणाऱ्या या व्याख्यानाचे सर्व घटकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा