![]() |
शिरोळ मध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण |
*प्रविणकुमार माने : उपसंपादक*
शिरोळ : शिरोळ मधील पाण्याच्या टाकीजवळ राहत्या घरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण २३ मे,२०२२ रोजी रात्री १०.३० दिनांक २४ मे,२०२२ रोजी पहाटे ५.३० या कालावधीत राहत्या घरातून केले आहे.सदरची १७ वर्षीय अल्पवयीन मुलगीचे अपहरण झाले असल्या बाबतची तक्रार शिरोळ पोलीस ठाण्यात मुलीची आई सौ.शारदा गुरव यांनी दिली आहे.
याबाबत अधिकृत सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सदरची मुलगी कु. सारिका गुरवचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. उंची पाच फूट,रंग गोरा, अंगाने सडपातळ, निळ्या रंगाचा टॉप, राखाडी रंगाची जीन्स असा पेहराव असून पायात पैजण आणि चॉकलेटी रंगाची बॅग तिच्याजवळ आहे. २३ मे रोजी रात्री साडेदहा ते २४ मे रोजी पहाटे साडेपाच पर्यंतच्या कालावधीत अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून कु. सारिका हिला घरातून पळून नेल्याचे तक्रारीत नमूद केला आहे. याबाबतचा अधिक तपास किशोर पोलीस करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा