![]() |
संग्रहित छायाचित्र |
उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात ही घटना घडली असून डोक्यावर पडलेले आणि 'विगे'खाली लपविलेले टक्कल नवरदेवाला महाग पडले. ऐन मंडपात चक्कर आली, नवरदेव पडला, विग एकीकडे, उघड झालेल्या टकलासह नवरदेव एकीकडे... नवरदेवाला टक्कल आहे, हे लक्षात येताच नवरीने मांडवातच तांडव सुरू केले.आपला होणारा नवरा टकला असल्याची माहिती कळताच तिलाही कल्पनाच सहन झाली नाही.अखेर नवरदेवाला नवरी तर गमवावी लागली. तर फसवणुकीच्या गुन्ह्याखाली ५ लाख ६६ हजार रुपयांचा भुर्दंड भरावा लागला.
पडलेल्या नवरदेवाला आधार देऊन उठवणे सोडाच... टक्कल पाहून तिने त्याला लात घातलीच होती; पण एका समजूतदार बाईने तिला आवरले.एक गहजब झाला आणि विवाहाचे निम्मे विधी पार प्पडलेले होते अन् नवऱ्या मुलाला पाहुण्यासमोरच लग्नमंडपात संतापात तिने 'ये शादी नहीं हो सकती, असे खडे बोल सुनावले नंतर प्रकरण पोलिसांत गेले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा