Breaking

शनिवार, २८ मे, २०२२

*स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी जिद्द व चिकाटीची गरज : इंद्रजीत देशमुख यांचे प्रतिपादन*






मार्गदर्शन करताना मा. इंद्रजीत देशमुख साहेब


*प्रा. चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*


नृसिंहवाडी : "स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी कोणती परिस्थिती कारणीभूत नसून जिद्द व चिकाटी यांच्या बळावर आपण यशाला गवसणी घालावी. सध्या युवा वर्गामध्ये मोबाईलचा गैरवापर वाढत असून मोबाईलच्या अकरा- अकरा तास अती वापर करणाऱ्या युवकांना गंभीर आजार होत आहेत." असे प्रतिपादन वक्ते इंद्रजीत देशमुख यांनी केले. 

     नृसिंहवाडी येथे अशोक पुजारी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने युवकांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोकराव पुजारी होते. माजी सरपंच धनाजीराव जगदाळे व अभिजित जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.श्री देशमुख पुढे म्हणाले "कल्पना चावला यांनी वयाच्या पाचव्या वर्षी  अवकाशात्री होण्याचे स्वप्न मनात बिंबवले होते. कृतिनिष्ठ प्रयत्नांनाच नशीबाची साथ मिळते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना एकाग्रता टिकवली पाहिजे. त्याच्या बळावरच आपण आपल्या करिअरला बळ देवू  शकता. यावेळी त्यांनी ग्रेटा थनबर्ग, युसूफ मलाला, IAS राजेंद्र भारूड या कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्वांची उदाहरणे दिली"

       यावेळी अशोक पुजारी यांच्या हस्ते श्री देशमुख व श्री जगदाळे यांचा सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाला उद्योजक हर्षद पुजारी, अलका खोचरे, डॉ. दिनेश फडणीस, शशिकांत कोडणीकर, शहानुर शेख, किरण मुडशिंगे, सुरेश नंदगावें, सुरेश खिरुगडे, किरण नाईक, स्नेहल नंदगावें, प्रा. चिदानंद आळोळी आदी उपस्थित होते. दर्शन वडेर यांनी सूत्रसंचालन केले.  कार्यक्रमाच्या संयोजनासाठी जितेंद्र आणुजे यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा