Breaking

शनिवार, २८ मे, २०२२

*जयसिंगपुरात नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फौंडेशन व अमरसिंह खाडे यांच्या सहयोगाने आधारकार्ड कॅम्पचे यशस्वी आयोजन*


भव्य आधारकार्ड शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मा.अजय पाटील-यड्रावकर

*करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी*


जयसिंगपूर  : नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फौंडेशन व मा श्री अमरसिंह खाडे यांच्या सहयोगाने जयसिंगपूर व पंचक्रोशीतील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी दोन दिवशीय आधार कार्ड कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पचे उद्घाटन युवा नेते मा.अजय पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी माजी नगरसेवक मा. संभाजी मोरे,सर्जेराव पवार व  गुंडाप्पा पवार उपस्थित होते.

   सदर कॅम्प मध्ये १) ० ते ५ वयापर्यंतच्या मुलांचे आधार कार्ड मोफत काढून देण्यात आले. २) बायोमेट्रिक आणि आधार कार्ड वरील चूक दुरुस्ती करण्यात आल्या. ३) त्याचबरोबर मोबाईल नंबरशी आधारकार्ड लिंक करण्याची उत्तम व्यवस्था या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आली. 


     सदर कॅम्पचे आयोजन गुरुवारी २६/५/२२ व शुक्रवारी २७/५/२२ रोजी सकाळी १० ते ५ वा.पर्यंत श्री दत्त सहकारी नोकर गृहनिर्माण संस्था मर्या..मोदी हॉस्पिटलजवळ हॉटेल लँडमार्क समोर दत्त कॉलनी जयसिंगपूर येथे करण्यात आले.

       या शिबिराचा जयसिंगपूरातील असंख्य नागरिकांनी लाभ घेतला असून सदर कॅम्प बाबत नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. त्याचबरोबर पुन्हा अशा लोकोपयोगी शिबिराचे आयोजन करण्याबाबत त्यांनी मागणीही केली आहे.

     आधारकार्ड कॅम्पचे उत्तम नियोजन सामाजिक कार्यकर्ते श्री अमर खाडे याच्या मार्गदर्शनाने , श्री विनायक गायकवाड , श्री रोहित नांद्रेकर , श्री रोहित पाथरवट , श्री राज खाडे , श्री दिग्विजय पाटील , श्री सूरज गाडीवडर , श्री विशाल वारे , श्री विक्रम खाडे , श्री सतिश खाडे , श्री आबा खाडे , व दत्त काॅलनी मधिल सर्व जेष्ट नागरिक महिला वर्ग व नामदार यड्रावकर फौंडेशनचे सर्व पदाधिकारी होते ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा