Breaking

रविवार, ५ जून, २०२२

*पुणे-बेंगलोर हायवे वर मोठा अपघात : जयसिंगपुरातील एकाच कुटुंबातील ५ जण ठार*

 

पुणे बेंगलोर हायवे वर मोठा अपघात


कोल्हापूर :पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गवर कार व कंटनेरचा आज पुणे बेंगलोर हायवे वर मोठा अपघात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात वाळवा तालुक्यातील कासेगावजवळ आज (शनिवार) दुपारी ०४.०० वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातातील मृत जयसिंगपूर येथील मगदूम सोसायटी मधील आहेत. अरिंजय आण्णासो शिरोटे (वय ३८), स्मिता अभिनंदन शिरोटे, सुनेशा अभिनंदन शिरोटे (वय १०) विरु अभिनंदन शिरोटे अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. अरिंजय हे नौदलात नोकरीस होते.


       घटनास्थळावरून प्राप्त झालेले माहिती अशी की, कारमधून (एम एच १४ डी. एन. ६३३९) मृत कुटुंब पिंपरी – चिंचवडहून जयसिंगपूरकडे निघाले होते. यावेळी कासेगावजवळील येवलेवाडी फाटा येथे कार रस्त्याकडेला थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरात धडकली. या अपघातात कारमधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा