Breaking

रविवार, १९ जून, २०२२

*सदा लोकरे यांच्या निधनाने एक बिनीचा शिलेदार हरपला ; समाजवादी प्रबोधिनीतील शोकसभेत मत*


इचलकरंजीच्या समाजवादी प्रबोधिनीत शोक सभा


*प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*


इचलकरंजी : सदा लोकरे हे  इचलकरंजी व परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक ,सहकार अशा सर्व क्षेत्रातील एक अतिशय रचनात्मक विचारांचे धडाडीचे ,कर्तबगार ,दानशूर,कर्तव्यदक्ष ,व्यक्तिमत्त्व होते.त्यांच्या निधनाने मोठे नुकसान झाले आहे.त्यांनी हाती घेतलेले काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणे याबद्दल त्यांची ख्याती होती.त्यांच्या निधनाने एक बिनीचा शिलेदार आपण गमावला आहे. राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून त्यांनी समाजवादी समाजरचनेसाठी जे काम केले ते पुढे नेणे हीच त्यांना खरी अदारांजली ठरेल असे मत समाजवादी प्रबोधिनी येथे झालेल्या सदा लोकरे अभिवादन व स्मृती शोकसभेत व्यक्त करण्यात आले.कॉ.दत्ता माने यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.

       या सभेत बी.आर.चरापले ( कौलव) ,दलीतमित्र व्यंकाप्पा भोसले ( कोल्हापूर),हिंदुराव शेळके, प्रसाद कुलकर्णी,सदा मलाबादे,बजरंग लोणारी,अहमद मुजावर,रमेश मर्दा, शिवाजी साळुंखे,शाहीर विजय जगताप, प्राचार्य ए.बी.पाटील,विनायक सपाटे,तात्यासाहेब यादव,भाऊसाहेब कसबे,शंकर असगर,जयंत बलुगडे,सुनील बारवाडे,डी.एस.डोणे,बी.जी.देशमुख,रोहित दळवी,धनंजय धोत्रे आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी धोंडिबा कुंभार, प्रा.अशोक कांबळे, रघुनाथ कांबळे, मारुती बोडके,यशवंत शिंदे,विठ्ठल कांबळे, अरुण निंबाळकर,आनंदराव  चव्हाण,अरिकृष्ण अडकिल्ला,सतीश मगदूम,अभिषेक पाटील,शामराव गेजगे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.प्रास्ताविक  बजरंग लोणारी यांनी तर सूत्रसंचालन सदा मलाबादे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा