![]() |
प्रा. डॉ. अरुण जाधव कोथळीकर |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
चंदगड : प्रा. नामदेवराव दुंडगेकर चंदगड तालुका शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीत प्रा. डॉ अरुण जाधव कोथळीकर यांची संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे.
मुळात प्रा. डॉ. अरुण जाधव सामाजिक संवेदनशील व सामाजिक कार्यात कटिबद्ध असलेले व्यक्तिमत्व आहे. विविध चळवळीच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न ऐरणीवर आणून त्यांना न्याय देण्यासाठी ते नेहमीच सक्रीय असतात. त्याचबरोबर अर्थशास्त्र विषयाचे अध्ययन-अध्यापन व संशोधन कार्याच्या माध्यमातून त्यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे. तत्व व विचारांशी सुसंगत त्यांचा जीवन प्रवास सुरू आहे.
सामाजिक व अर्थशास्त्रीय परिपूर्ण ज्ञान असणाऱ्या अभ्यासू व्यक्तिमत्वाची बिनविरोध निवड होणे हे खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. पतसंस्थेच्या चौफेर विकासासाठी ते निश्चितपणे कटिबद्ध राहणार.त्यांच्या या निवडीने समस्त घटकाकडून समाधान व्यक्त करुन अभिनंदन व्यक्त केले जात आहे. त्यांच्या या सुयशाबद्दल जय हिंद न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने मनस्वी अभिनंदन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा