Breaking

बुधवार, १५ जून, २०२२

*शिवाजी विद्यापीठातील प्रा.डॉ. चंद्रकांत लंगरे यांची पोलंड येथील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रासाठी निवड*


प्रा. डॉ. चंद्रकांत लंगरे( इंग्रजी अधिविभाग)


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील इंग्रजी अधिविभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. चंद्रकांत लंगरे यांची लुब्लीन (पोलंड) येथील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रासाठी निवड झाली आहे. 

     ते सदरच्या चर्चासत्रात 'बीयाँड द वर्ल्ड ऑफ के ऑस रिथिंकींग जोसेफ कॉनरॅडस् ह्युमॅनिझम इन हीज लाईफ नरेटिव्हज्' हा शोधनिबंध सादर करणार आहेत. सदरचे चर्चासत्र जोसेफ कॉनरॅड सोसायटी, पोलंड, मारीया क्युरी स्क्लोडोव्हस्का युनिव्हर्सिटी, लुब्लीन, पोलंड येथे दिनांक २० जून ते २३ जून २०२२ या कालावधीत संपन्न होणार आहे. सदरचे चर्चासत्र हे कोलंबीया युनिर्व्हसीटी प्रेस, न्यूयॉर्क, युरोपियन पार्लमेंट आणि इंग्रजी भाषा व साहित्य अधिविभाग मारीया क्युरी युन्हिव्हर्सिटी लुब्लीन यांचा हा संयुक्त आंतरराष्ट्रीय ग्रंथ प्रकल्पाचा भाग आहे. 

   डॉ. लंगरे यांनी जगप्रसिद्ध आंग्ल कादंबरीकार जोसेफ कॉनरॅड यांच्या कादंबरीवर आपले पीएच. डी. चे संशोधन केले आहे आणि या विषयावर त्यांनी यापूर्वी इंग्लंड आणि इटली या देशात, जोसेफ कॉनरॅड सोसायटी (इंग्लंड) यांनी नामवंत विद्यापीठात आयोजित केलेल्या चर्चासत्रात आपले संशोधन पर लेख सादर केले आहेत. या चर्चासत्रानंतर ते पोलंड येथील वॉरझॉ, क्रॅकॉ आणि झॅकोपेन येथील जोसेफ कॉनरॅड यांच्या साहित्य आणि सांस्कृतिक योगदानावर निर्माण झालेल्या संग्रहालय व स्मृतीस्थळांना भेट देणार आहेत. त्यांना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा.डॉ.डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू मा. प्रा.डॉ.पी. एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, इंग्रजी अधिविभागाच्या प्रमुख प्रा. तृप्ती करेकट्टी आणि सहकारी यांचे विशेष मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. या चर्चासत्रासाठी ते लवकरच पोलंडला रवाना होत आहेत.

     त्यांची निवड झाल्याने प्राध्यापक व विद्यार्थी वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा