![]() |
कोथळी मध्ये आरोग्य शिबिर संपन्न |
*जीवन आवळे : कोथळी प्रतिनिधी*
कोथळी : संजीवनी मुळे अनेकांना जीवनदान सरपंच भरतेश खवाटे यांचे प्रतिपादन. जयसिंगपूर येथील संजीवनी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर मध्ये किरोना कलामध्ये व इतर वेळी चांगल्या पद्धतीने योग्य उपचार होत, असल्याने आणि अतिदक्षता विभागाची सोय असल्याने हॉस्पिटल आणि त्यांना जीवदान देणारा ठरल आहे. असे मत सरपंच भरतेश खवाटे यांनी व्यक्त केलं. कोथळी येथील आरोग्य उपकेंद्रात संजीवन हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या, मोफत आरोग्य तपासणी शिबिर व महात्मा फुले जन आरोग्य योजना बाबत मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
या शिबिरात 102 रुग्णांची तपासणी करून औषधे देण्यात आली. तसेच पुढील योग्य उपचारासाठी रूग्णांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर शिबिराचे उद्घाटन सरपंच भरतेश खवाटे यांच्या हस्ते करण्यात आले. व डॉ. प्रविण जैन यांच्या हस्ते फीत कापून शिबिराला सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉक्टर जैन म्हणाले या गावातील अनेक रुग्णांनी आमच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन आम्हाला रुग्ण सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त केले, तसेच यापुढेही कोथळीकरणी आम्हाला भविष्यात असेच सहकार्य करावे अशी भावना व्यक्त करून महात्मा फुले जन आरोग्य योजना बाबत मार्गदर्शन तसेच योजने व्यतिरिक्त होणारे उपचार, दुर्बीण द्वारे उपलब्ध शस्त्रक्रिया बाबत माहिती दिली.
यावेळी डॉ.वेंकटेश पत्की डॉ. सीमा जैन,डॉ. चेतना पत्की यांच्यासह त्यांच्या टीमने रुग्णांची तपासणी केली. यावेळी उपसरपंच राजश्री सुतार, क्रांती दूध संस्थेचे चेअरमन संजय नांदणे ग्रामविकास अधिकारी राहुल नाईक ग्रामपंचायत सदस्य ऋषभ पाटील, अनमोल करे, विजय खवाटे, राजेश विभुते, हिदाई नदाफ, नितीन वायदंडे, संजय चव्हाण, सचिन कांबळे, संदिप मोरे, अभय तिवडे, हेमा मोरे, आदीसह कोथळी आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टर सर्व कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा