Breaking

गुरुवार, २ जून, २०२२

*शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) कडून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 'आंदोलन विशेषांक' प्रकाशन सोहळा संपन्न*


आंदोलन विशेषांकाचे प्रकाशन करताना


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर  : महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या कार्यकारी मंडळाच्या रविवार दिनांक ८ मे २०२२ रोजीच्या बैठकीत संमत करण्यात आलेल्या ठरावानुसार सुटाच्या वतीने आंदोलन विशेषांक प्रकाशित करण्यात आले.

     ७१ दिवसाच्या बेकायदेशीर वेतन कपातीचा अर्धवट परतावा आणि यूजीसी रेग्युलेशनची अर्धवट अंमलबजावणी या दोन महत्वाच्या मुद्द्यावर आधारित मा. उच्च व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी न करता उलटपक्षी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. मा. उच्च व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांप्रती सचिव, उच्च शिक्षण व संचालक, उच्च शिक्षण यांच्या अशोभनिय वर्तनाचा तीव्र निषेध करण्याच्या हेतूने महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ (एमफुक्टो )ने आंदोलन पुकारले असून यानुसार आंदोलनाच्या टप्प्यातील पहिला व महत्त्वाचा टप्पा म्हणून संपूर्ण राज्यातील विविध प्राध्यापक संघटनेकडून 'आंदोलन विशेषांकाची' प्रसिद्ध करण्यात आली आहे.

       प्राध्यापकांच्या न्याय व हक्कासाठी सातत्याने निर्भीडपणे लढणारी संघटना अर्थात शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) कडून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ,कोल्हापूर ( सुटाच्या) 'आंदोलन विशेषांक' प्रकाशन सोहळा रविवार दि. २९ मे २०२२ रोजी सुटाचे मुख्य समन्वयक प्रा. एस. जी. पाटील (बाबा) यांच्या नेतृत्वाखाली, कोल्हापूर जिल्हा समन्वयक प्रा. सुधाकर मानकर, सांगली जिल्हा समन्वयक प्रा. टी. व्ही.स्वामी, सुटा अध्यक्ष डॉ.आर.के. चव्हाण, सुटा कार्यवाह डॉ. डी. एन. पाटील, सुटा मध्यवर्तीचे सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडला.

    यावेळी प्राध्यापकांच्या हक्कासाठी आंदोलनाचे सर्व टप्पे यशस्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा