Breaking

गुरुवार, २ जून, २०२२

*विधवा महिलांच्या सन्मानार्थ अनिष्ट परंपरा रद्द करणारी शिरोळ नगरपालिका ही जिल्हात ठरली पाहिली*

 

शिरोळ नगरपरिषदेकडून विधवा महिलांच्या सन्मानार्थ ठराव


*ओंकार पाटील : शिरोळ प्रतिनिधी*


शिरोळ  : महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी पतीच्या निधनानंतर गळ्यातील मंगसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे, कपाळावरील कुंकू पुसणे यासह अन्य अनिष्ट रूढी परंपरा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय शिरोळ नगरपालिकेच्या विशेष सभेत घेण्यात आला असा निर्णय घेणारी शिरोळ नगरपालिका ही कोल्हापूर जिल्हातील  पहिली नगरपालिका ठरली आहे.

    शिरोळ  नगरपालिकेच्या सभागृहात आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.या विशेषसभेच्या अध्यक्ष स्थानी नगराअध्यक्ष अमरसिंह पाटील होते विशेष विधवा महिलाना समाजामध्ये सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी जनजागृती करणे तसेच पतिच्या निधनानंतर कुंकू पुसणे, जोडवी काढणे, मंगळसूत्र तोडणे, बागड्या फोडणे या अनिष्ट रूढी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.उपनगराध्यक्ष तातोबा पाटील यांनी सूचक तर त्यास नगरसेविका कमलाबाई शिंदे यांनी अनुमोदक दिले हेरवाड गावाच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला तसा ठराव एकमताने  संमत करण्यात आला शिरोळ नगरपरिषदेने ऐतिहासिक असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला या सभेस नगरसेवक सर्वश्री व सर्व नगरसेविका मुख्याधिकारी तौमुर मुलांनी उपस्थित होते.

   विधवा महिलांच्या अनिष्ट प्रथा बंद करण्याचे ठराव करून  शिरोळ तालुक्यात हेरवाड, गणेशवाडी, धरणगुत्ती व नांदणी या गावा पाठोपाठ पुरोगामी विचारांचा लढा व कृती करण्याचं काम  शिरोळ नगर परिषदेने करून  देशासमोर किंबहुना महाराष्ट्र समोर एक आदर्श ठेवला आहे. असाच ठराव शिरोळ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती व नगरपरिषद करण्यात यावा अशा प्रकारचा ठराव जय हिंद न्यूज नेटवर्क कडून करण्यात येत आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा