Breaking

शनिवार, ११ जून, २०२२

*सुटाचे ज्येष्ठ नेते प्रा.एस.जी.पाटील (बाबा) यांचा रविवारी कृतज्ञता सत्कार सोहळ्याचे आयोजन*


    सुटाचे जेष्ठ नेते व प्रमुख समन्वयक मा.
प्रा.एस.जी.पाटील (बाबा)

*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा)चे ज्येष्ठ नेते प्रा. एस. जी. पाटील(बाबा)यांच्या कृतज्ञता सत्काराचे आयोजन सुटाच्या वतीने रविवार १२ जून,२०२२ रोजी केले आहे. रविवारी सकाळी ११.०० वाजता शिवाजी विद्यापीठातील वि. स. खांडेकर भाषाभवन सभागृहात कुलगुरु प्रो.डॉ. डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रा. बी. टी. देशमुख उपस्थित राहणार आहेत. तर प्रा. डॉ. अशोक बर्मन, प्रा. सी. आर सदाशिवन, प्रा. एस. पी. लवांदे, प्रा. प्रवीण रघुवंशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सदर कार्यक्रमास प्राध्यापकासह समाजातील सर्व घटकांनी उपस्थित राहणे बाबतचे आवाहन सुटाच्या वतीने करण्यात आले आहे.

        सुटाचे जेष्ठ व प्रमुख समन्वयक प्रा. एस.जी.पाटील अर्थात बाबा यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा संपन्न होत आहे.प्रा. पाटील यांनी सुटा संघटनेच्या स्थापनेपासून ते आज तागायत प्राध्यापक घटकांच्या प्रश्नाविषयी सातत्याने संघर्ष करीत राहिले. त्यांनी आपलं जीवन हे पूर्णतः प्राध्यापकांच्या न्याय व हक्कासाठी समर्पित केले आहे.प्रा.पाटील यांनी वैचारिक लढाई व चळवळीच्या माध्यमातून  कायद्याच्या चौकटीत राहून व्यवस्थे विरोधी न्याय मिळेपर्यंत संघर्ष करीत राहिले. नोकरीच्या कार्यकाळात व सेवानिवृत्तीनंतरही कोणतीही अपेक्षा न बाळगता शैक्षणिक चळवळ पुढे नेणे हा त्यांचा स्थायीभाव बनला आहे. या प्रवासात त्यांना अनेक प्रश्नांना सामोरे जात असताना मान-अपमान याची तमा न बाळगता कार्य करीत राहिले. कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण राज्यात अत्यंत बिकट अवस्था असताना जयसिंगपूरच्या डॉ. जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजिनीरिंग मधील प्राध्यापकांच्या आंदोलनात ते सक्रिय सहभागी झाले. त्यांची वैचारिक व संघर्षमय लढाई आजही विविध आंदोलनाच्या माध्यमातून सुरू आहे.

     प्रा.एस.जी.पाटील यांचे व्यक्तिमत्व दीपस्तंभासारखे आहे. त्यांचा उद्या संपन्न होणारा कृतज्ञता सोहळा हा समस्त प्राध्यापकांसाठी आनंदाची, प्रेरणा व उत्साहाची ज्योत निर्माण करणारी आहे हे मात्र सत्य आहे. बाबांच्या या कृतज्ञता सोहळ्यास खूप खूप शुभेच्छा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा