Breaking

शुक्रवार, १० जून, २०२२

एम.फुक्टोच्या आंदोलनात सर्व प्राध्यापकांनी सहभागी व्हावे- प्रा.डॉ.ईला जोगी यांचे आवाहन

 

सुटा सातारा शाखेच्या वतीने आवाहन

प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक


  सातारा - ‌‌ प्राध्यापकांच्या न्याय मागण्यासाठी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने (एम.फुक्टो ने) पुकारलेल्या आंदोलनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सातारा जिल्ह्यतील सर्व प्राध्यापकांनी सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे असे आव्हान प्रा . डॉ . ईला जोगी ( अध्यक्षा, सुटा सातारा) यांनी केले आहे . सातारा येथील पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या .       

     एम.फुक्टो. कार्यकारणीची बैठक अमरावती विद्यापीठामध्ये दि. ८ मे २०२२ रोजी झाली. या बैठकीमध्ये ७१ दिवसाच्या बेकायदेशीर वेतन कपातीचा अर्धवट परतावा आणि यूजीसी रेगुलेशनची अर्धवट अंमलबजावणी करणारे सचिव, उच्च व तंत्र शिक्षण आणि संचालक, उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या विरोधातील आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील प्राध्यापकांनी ०४ फेब्रुवारी २०१३ ते १० मे २०१३ या काळात परीक्षा बहिष्कार आंदोलन केले होते . या आंदोलन काळातील पगार तत्कालीन शासनाने कपात केला होता . त्या विरोधात संघटनेने उच्च व सर्वोच्च न्यायालयातील लढाई जिंकून सुद्धा न्यायालयीन आदेशाची अद्यापही शासनाने पूर्णपणे अंमलबजावणी केली नाही . तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाचे रेगुलेशन्स हे बंधनकारक असताना सुद्धा त्यामध्ये शासनाने सोयीच्या (प्राध्यापकांना अडचणीत टाकणाऱ्या) दुरुस्त्या करून शासन आदेश निर्गमित केला आहे . याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील अनेक प्राध्यापक हे पदोन्नती, एम .फिल. व पीएच. डी . वेतनवाढी, इत्यादी लाभापासून वंचित राहिले आहेत . अमरावती येथील बैठकीत महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न सुद्धा हाती घेतला असून तो सोडवण्यासाठी धोरणात्मक चर्चा झाली आहे.

      परीक्षा बहिष्कार आंदोलनाला शासन आदेशामध्ये संप असा शब्द प्रयोग करून समाजाची दिशाभूल करून प्राध्यापकांबाबत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी केलेला आहे . प्राध्यापक महासंघाने कधीही या आंदोलनाचा उल्लेख 'संप' म्हणून केलेला नव्हता .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा