Breaking

बुधवार, २० जुलै, २०२२

जयसिंगपूर - उंदीर पकडायच्या रॅट ग्लू बोर्डवर अडकला चिमुकला पक्षी - प्राणीमित्र अक्षय मगदूम यांनी केली सुटका

 

✍🏼 मालोजीराव माने - कार्यकारी संपादक (पर्यावरण पत्रकार )

      जयसिंगपूर - उंदीर पकडायच्या रॅट ग्लू बोर्डवर  चिमुकला पक्षीच अडकून बसल्याची घटना आज जयसिंगपूर येथे दिसून आली.  प्राणीमित्र अक्षय मगदूम यांनी त्याची सुखरूप सुटका केली.





     यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. ज्यामधे साप, बेडूक, सरडे, पक्षी, ई. अडकल्याच्या घटना घडल्या आहेत. 

     या बोर्डवर चिटकलेले उंदीर दूर सोडताना बोर्डसहित सोडली - टाकली जातात. त्यामुळे निसर्गात ती तशीच पडून राहतात. बोर्डचा चिकटपणा कॉन्सट्रेटेड अधेसिव पासून बनवला असल्याने तो लवकर वाळत नाही. परिणामी निसर्गात वावरणारे निसर्गोपयोगी जीवजंतू याला अडकून बसतात व तडफडून मृत्यु पावतात. कधी कधी या बोर्डवर अडकलेली उंदरे खाण्यासाठी साप, मांसाहारी पक्षी येतात व तेही या बोर्डवर चीटकून बसतात व कालांतराने तडफडून मृत्यु पावतात.

      

सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांनी सोलापूर येथे रेस्कु केलेला  रॅट ग्लु बोर्डवर चिटकलेला बिनविषारी तस्कर साप.  

  रॅट ग्लु बोर्ड वापरून झाल्यावर त्याची योग्य व पुर्ण विल्हेवाट लावावी, त्याचा चिकटपणा पूर्णपणे गेल्याशिवाय त्याला निसर्गात कुठेही टाकू नका. उंदीर पकडण्यासाठी रॅट ग्लु बोर्ड पेक्षा पिंजरा वापरणे अधिक सोपे व कमी खर्चाचे आहे. शिवाय अडकलेले उंदीर सोडणेही सोपे जाते. 

                 प्राणीमित्र अक्षय मगदूम, जयसिंगपूर. 

                 99223 03712

     



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा