![]() |
मा. मिलिंद शाह(वाघोलीकर) सचिव,गव्हर्निंग कौन्सिल अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामती मार्गदर्शन करताना |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामतीच्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरला गव्हर्निंग कौन्सिल बारामतीच्या पदाधिकारी व सदस्यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी अनेकांत एज्युकेशन सोसायटी गव्हर्नर कौन्सिल बारामतीचे सचिव मा.मिलिंद राजकुमार शाह (वाघोलीकर),सदस्य मा. चंद्रगुप्त माणिकलाल शाह(वाघोलीकर), स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन मा.डॉ. सुभाष अडदंडे,सचिव मा.डॉ.महावीर अक्कोळे हे उपस्थित होते.
सुरुवातीस जयसिंगपूर कॉलेजचे प्र.प्राचार्य प्रा.डॉ.नितीश सावंत यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कॉलेजच्या शैक्षणिक प्रगतीचा थोडक्यात आलेख मांडला.
चंद्रगुप्त माणिकलाल शाह(वाघोलीकर) यांनी सन २००३ पासून आज तागायत कॉलेजच्या शैक्षणिक व भौतिक प्रगती केली असून यास स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन डॉ.सुभाष अडदंडे,सचिव डॉ. महावीर अक्कोळे,मा. पद्माकर पाटील व अन्य पदाधिकारी व सदस्यांचे मोठ योगदान असल्याबाबत त्यांनी कौतुक केले. त्याचबरोबर प्राचार्य, महाविद्यालयीन प्राध्यापक व प्रशासकीय सेवक व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या साथीने शैक्षणिक विकासाचा रथ पुढे मार्गक्रमण करीत आहे अशा प्रकारचे सकारात्मक भाष्य केले.
स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन डॉ.सुभाष अडदंडे म्हणाले, अनेकांत एज्युकेशन सोसायटी गव्हर्निंग कौन्सिल बारामतीचे विद्यमान अध्यक्ष मा. जवाहरभाई शाह यांच्या नेतृत्वाखाली, त्यांनी ठेवलेला विश्वास , दिलेली जबाबदारी व सहकार्य याच्या आधारावरच ग्रामीण भागातील जयसिंगपूर कॉलेज या संस्थेचा शैक्षणिक व भौतिक प्रगतीचा कायापालट होत आहे. जयसिंगपूर कॉलेजने विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थी हितार्थ कार्य केले आहे. यापुढेही शैक्षणिक विकासाची घोडदौड या पद्धतीने राहील अशा प्रकारचा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
सचिव मा.मिलिंद राजकुमार शाह (वाघोलीकर) मार्गदर्शन करताना म्हणाले, वीस वर्षांपूर्वीचे जयसिंगपूर कॉलेज व सध्या असलेलं कॉलेज यामधील भौतिक व शैक्षणिक प्रगतीचे अंतर खूप आहे. हे शैक्षणिक विकासाचे पाऊल चेअरमन डॉ.सुभाष अडदंडे,सचिव डॉ. महावीर अक्कोळे,मा. पद्माकर पाटील व त्यांच्या सर्व घटकांचे आहे.जयसिंगपूर कॉलेज शैक्षणिक विकासात अग्रेसर असून समस्त शैक्षणिक विकासाचा मानदंड होताना दिसत आहे अशा प्रकारचा गौरवउद्गार याप्रसंगी त्यांनी काढला. जयसिंगपूर कॉलेजच्या विकासासाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारचे सहकार्य अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामती संस्थेच्या वतीने करण्यात येईल अशा पद्धतीने त्यांनी आश्वासित केले.
या सदिच्छा भेट कार्यक्रमाचे आभार संस्थेचे सदस्य प्रा. अप्पासाहेब भगाटे यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस.डी.चौगुले यांनी केले.या कार्यक्रमास संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. त्याचबरोबर उपप्राचार्य, कार्यालयीन अधीक्षक, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा