![]() |
सैनिक टाकळीतील जवानाचा अपघाती मृत्यू |
*संजय सनदी : टाकळीवाडी प्रतिनिधी*
टाकळीवाडी : जयसिंगपूर - शिरोळ मार्गावर झालेल्या दुर्दैवी अपघातातील जवान दिगंबर कृष्णाजी चव्हाण (वय वर्ष २५, रा. सैनिक टाकळी, ता. शिरोळ) यांचा कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात शनिवार दि.९ जुलै,२०२२ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सैनिक टाकळीतील जवान दिगंबर चव्हाण हे १५ दिवसांपूर्वी सुट्टीवर आले होते. वडील आजारी असल्याने त्यांना जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांना पाहून घरी येत असताना गुरुवार दि.७/७/२०२२ रोजी जयसिंगपूर-शिरोळ रस्त्यावर अपघात झाला होता. सांगली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी त्यांचा उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.
त्यांचे पार्थिव सैनिक टाकळी येथे आणण्यात आले. बेळगाव येथील आर्मी पथकाकडून मानवंदना देऊन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिरोळ तहसीलदार कार्यलायातील नायब तहसीलदार,अधिकारी व समस्त गावकरी उपस्थित होते. त्यांच्या मागे आई, वडील, तीन बहिणी, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.
या दुर्दैवी घटनेने सैनिक टाकळी सह शिरोळ तालुक्यात सर्वत्र शोककळा पसरली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा