Breaking

सोमवार, १८ जुलै, २०२२

*सुटा कोल्हापूर जिल्ह्याचा मेळावा उत्‍साहात संपन्‍न*


सुटा कोल्हापूर जिल्हा मेळावा


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : एमफुकटोने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाठिंबा मिळत आहे.याचाच भाग म्हणून शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या वतीने आजतागायत आंदोलनाचा प्रत्येक टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे.

     याच पार्श्वभूमीवर रविवार दि.१७ जुलै २०२२ रोजी कोल्हापूर जिल्हा सुटा संघटनेच्यावतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीस कार्यवाह प्रा.डॉ.डी.आर.भोसले यांनी या मेळाव्यातील उपस्थित प्राध्यापकांचे स्वागत करून मेळ्यावाचा हेतू स्पष्ट केला. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रकाश कुंभार यांनी सुटाने केलेल्या विद्यापीठ पातळीवरील कार्याचा आढावा घेतला. प्लेसमेंट कॅम्प व शैक्षणिक प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न सुटाने केला. यामधील विशेष भाग म्हणजे प्रोफेसर पदाच्या कामी सुटा ने उत्तम कार्य केले आहे.

      सुटा कार्यवाह प्रा. डॉ. डी.एन.पाटील यांनी AIFUCTO ,MFUCTO व सुटा पातळीवर झालेल्या आंदोलनाचा सविस्तरपणे वृतांत मांडला. यामध्ये प्राध्यापक घटक केंद्रबिंदू मानून त्याच्या हितार्थ केलेल्या कामाचा आढावा घेतला.

     कोल्हापूर जिल्हा समन्वयक प्रा. सुधाकर मानकर यांनी शिवाजी विद्यापीठ निवडणूक २०२२ च्या संदर्भातील विविध पैलू समजावून सांगितले. कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष प्रा.डॉ.अरुण पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले,सुटा संघटनेमुळे आपला अस्तित्व अबाधित राहिला आहे.यामुळे आपल्याला सातत्याने सुटाच्या विचारांशी नाळ बांधून एकनिष्ठ राहून कार्य करीत राहणे आवश्यक आहे.

      या जिल्हा  मेळावाचे आभार जिल्हा खजिनदार डॉ. गजानन चव्हाण यांनी मानले. या कार्यशाळेत कोल्हापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा