![]() |
महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू |
दिल्ली : गेले काही दिवसांपासून बॅडमिंटनच्या (badminton) विविध नामांकित स्पर्धेत अपयशाला सामाे-या जाणा-या महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने सिंगापूर ओपन अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद पटकाविलं.
बॅडमिंटन पटू पी.व्ही.सिंधूने सिंगापूर ओपनमध्ये अंतिम फेरीत चीनच्या वांग झी यीवर (Wang Zhi Yi) २१-९, ११-२१, २१-१५ असा राेमहर्षक विजय मिळवला. उपांत्य फेरीत सिंधूनं जपानच्या कावाकामीला अवघ्या ३१ मिनिटांत पराभूत केलं हाेतं. तिनं हा सामना २१-१५ आणि २१-७ अशा मोठ्या फरकानं जिंकला हाेता.
पुसारला वेंकट सिंधू ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे. ती भारतातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक मानली जाते. सिंधूने ऑलिम्पिक आणि बी.डब्लू. एफ. सर्किट स्पर्धेसह विविध स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत. यामध्ये जागतिक चॅम्पियनशिपमधील सुवर्णपदकाचाही समावेश आहे. बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन बनणारी ती पहिली आणि एकमेव भारतीय आहे.
तिचा जन्म ५ जुलै, १९९५ रोजी हैदराबाद या ठिकाणी झाला असून तिचे प्रशिक्षक मा.पुल्लेला गोपीचंद हे आहेत. जागतिक महिला बॅडमिंटन पटू पी.व्ही.सिंधूला उच्चकोटीचे पद्मभूषण पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार व अर्जुन पुरस्कार - बैडमिंटन असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
तिच्या या सुयशाने प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी उच्च कोटीची कामगिरी केली आहे.सिंधूनं विजेतेपद मिळविताच तिच्या चाहत्यांनी समाज माध्यमातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा