*प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेच्या प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी, नोंदणीकृत पदवीधर आणि शिक्षक तसेच विद्यापरिषदेमध्ये निवडून द्यावयाचे आठ शिक्षक, आणि अभ्यासमंडळासाठी निवडून द्यावयाचे विभागप्रमुख यासाठी मतदार यादी तयार करण्यासाठी दिनांक ११ जुलै २०२२ पर्यंत ऑनलाईन स्वरूपात भरलेली माहिती अर्ज आवश्यक कागदपत्रासह विद्यापीठ कार्यालयाकडे दिनांक १५ जुलै २०२२ पर्यंत जमा करण्याबाबत कळविण्यात आले होते.
परंतु कोल्हापूर, सांगली व सातारा या तीनही जिल्हयात पाऊस मोठा प्रमाणात पडत आहे. त्यामुळे पाऊसाच्या पाण्याने जिल्हयातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे सदर बाब लक्षात घेवून निवडणूकीच्या अनुषंगाने ऑनलाईन स्वरूपात भरलेली माहिती / अर्ज आवश्यक कागदपत्रासह विद्यापीठ कार्यालयाकडे जमा करण्यासाठी दिनांक २० जुलै २०२२ रोजी सांयकाळी ६.०० वाजेपर्यंत मुदत वाढविण्यात आलेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा