![]() |
सुटाचे पदाधिकारी व प्राध्यापक |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या वतीने एमफुकटोच्या आदेशानुसार विविध मागण्यांसाठी काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन करण्यात आले.
सन २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना, ७१ दिवसांच्या बेकायदेशीर वेतन कपातीचा अर्धवट परतावा व महाराष्ट्र शासनाकडून चालू असलेल्या यूजीसी रेग्युलेशनची अर्धवट अंमलबजावणी आदी मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एमफुकटो संघटने बरोबर सुटा संघटनेने राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे.
महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या कार्यकारी मंडळाच्या ८ मे २०२२ रोजीच्या बैठकीत संमत करण्यात आलेल्या ठरावानुसार आंदोलनाचे टप्पे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या वतीने विशेषांक प्रकाशन, पत्रकार परिषदेचे आयोजन, जिल्हावार लोकप्रतिनिधींच्या भेटीगाठी व चर्चा, ई-मेल संदेश आंदोलन, सांगली सातारा व कोल्हापूर या ठिकाणी जिल्हा अधिवेशनाचे आयोजन अशा नियोजनबद्ध आंदोलनाच्या टप्प्यानुसार आंदोलन करण्यात आले.
काल शनिवार दि.१६ जुलै, २०२२ रोजी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या कार्यालयात प्राध्यापकांनी काळ्या फिती लावून कामकाज पूर्ण केले.
यावेळी एमफुकटोचे उपाध्यक्ष सुटा संघटनेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. आर.के.चव्हाण, सुटाचे प्रमुख समन्वयक प्रा.एस.जी.पाटील (बाबा), सुटा कार्यवाह प्रा.डॉ.डी. एन.पाटील, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.डॉ. आर.जी.कोरबू, कोल्हापूर जिल्हा समन्वयक प्रा. सुधाकर मानकर, खजिनदार प्रा.डॉ.अरुण शिंदे, कोल्हापूर जिल्हा सुटा अध्यक्ष प्रा. डॉ.अरुण पाटील, सातारा जिल्हा अध्यक्ष प्रा.डॉ.ईला जोगी, सांगली जिल्हा अध्यक्ष प्रा.डॉ.ए. बी.पाटील, प्रा.डॉ.मनोज गुजर,प्रा. डॉ.यु. ए.वाघमारे, प्रा.डॉ.डी.आर.भोसले , प्रा. युवराज पाटील, डॉ. तानाजी कांबळे ,डॉ. गजानन चव्हाण, डॉ.सयाजी पाटील,प्रा. सुरेश पोळ, प्रा.कु.सुनीता अमृतसागर, डॉ.वैशाली सारंग व डॉ.प्रभाकर माने हे सहभागी होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा