Breaking

गुरुवार, १४ जुलै, २०२२

*कै. श्री. रामकृष्ण मालू प्राथमिक विद्यामंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी*


कै. श्री. रामकृष्ण मालू प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमा साजरी


*गीता माने : सहसंपादक*


जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्तापूर्ण हेतूने कार्यरत असणारी शिक्षण प्रशालेत अर्थात कै. श्री. रामकृष्ण मालू प्राथमिक विद्यामंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी मुख्याध्यापक श्री.सुनील कोळी यांच्या हस्ते महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गुरुपौर्णिमेचे महत्व सोप्या भाषेतून मुलांना समजावून दिले.


मुख्याध्यापक मा.सुनील कोळी सर मार्गदर्शन करताना

बालचमू भाषणे करताना

           आजचा हा दिवस म्हणजे गुरुंच्याबद्दल कृतज्ञता दिन होय. या दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला.

    यावेळी शाळेतील काही चिमुकल्यां विद्यार्थ्यानी गुरूंच्या विषयी असणारी आस्था, त्यांच्यावरील दृढ विश्वास व निखळ श्रद्धेचा सन्मान करीत कु.रविराज प्रभाकर माने, कु.संचिता सचिन बेळकुडे,कु. दूर्वा अतुल काळे व कु.शुभदा चोबे यांनी उत्तम भाषणे केलीत.

    याप्रसंगी सर्व शिक्षक, कर्मचारी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

       सदर अनोख्या मात्र विद्यार्थ्यांना सुसंस्कारित करणाऱ्या गुरुपौर्णिमेचा दिन सादरीकरणाचे कौतुक पालक वर्गाकडून केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा