Breaking

शुक्रवार, २९ जुलै, २०२२

*रॉबिनहुड आर्मी कोल्हापूर तर्फे १ ते १५ ऑगस्ट दरम्यान अन्नवाटप कार्यक्रम*


रोबिन हूड आर्मी कोल्हापूर तर्फे अन्न वाटप

मालोजीराव माने  :  कार्यकारी संपादक


  कोल्हापूर : भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिन निमित्त, आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत भारतातील १६० पेक्षा जास्त शहरांमध्ये ७५ लाख लोकांना अन्न व तसेच वस्तूंच्या स्वरूपात मदत केली जाणार आहे. त्यात कोल्हापूर चे रॉबिन सदस्य सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. तसेच त्यासाठी त्यांनी 'साइन बोर्ड कँपेन' मार्फत या मोहिमेचा प्रचार व प्रसार शहरातील प्रमुख ठिकाणी करण्यात येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने बस स्टँड, रेल्वे स्टेशन, ताराराणी चौक, दसरा चौक, अंबाबाई मंदिर, महानगर पालिका, शिवाजी चौक, शिवाजी पुतळा अश्या अनेक ठिकाणी हे कॅम्पेन राबवण्यात येणार आहे.

     या उपक्रमात सागर अथने, सायली माने, मंजिरी देवाणावर, विशाल गुडूळकर आदी रॉबिन्स सहभागी झाले आहेत.

तरी कोल्हापुरातील जास्तीत जास्त लोकांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन रॉबीनहुड कोल्हापूर मार्फत करण्यात आलेले आहे.

   रोबिंनहूड आर्मीच्या या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा