![]() |
हर घर तिरंगा जनजागृती रॅली, जयसिंगपूर |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर पोलीस ठाणेच्या नेतृत्वाखाली आजादी का अमृत महोत्सव अभियानांतर्गत 'हर घर तिरंगा' या उपक्रमांतर्गत जयसिंगपूर शहरात उत्साहपूर्ण व जल्लोषात रॅलीचे आयोजन करण्यात आले.
सुरुवातीस हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जनजागृती करण्यासाठी मा.राजेंद्र मस्के यांनी योग्य मार्गदर्शन करून रॅली आयोजित केली. या रॅलीचे नेतृत्व मा.राजेंद्र मस्के, प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. सुभाष अडदंडे, डॉ. महावीर अक्कोळे, जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य प्रा. डॉ. नितीश सावंत, प्राचार्य डॉ. आर. एन. कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. गजाला सय्यद,उपप्राचार्य डॉ. सुनील बनसोडे,जोशी मॅडम, मा.भोसले सर,मा.डॉ.कोरे, प्रा.सुशांत पाटील,प्रा.डॉ.के.डी.खळदकर व प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी केले.
सुरुवातीस हर घर तिरंगा, स्वाभिमान तिरंगा, अभिमान तिरंगा, शान तिरंगा व भारत माता की जय या जोशपूर्ण घोषणेने संपूर्ण परिसर दुमदुमला. अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध पद्धतीने राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचा आकांताने ही रॅली शिरोळ रोड मार्गे -जय विजय शाळा- जयसिंगपूर नगरपालिकेच्या दिशेने - झेले बिल्डिंग जवळून - गांधी चौकापर्यंत- तेथून स्टेशन रोड मार्गे - क्रांती चौकापर्यंत- या रॅलीचा अंतिम समापन दसरा चौकात करण्यात आले.
क्रांती चौकात आल्यानंतर डॉ. महावीर अक्कोळे यांच्या हस्ते जयसिंग महाराज व छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मनोभावे अभिवादन करण्यात आले. यानंतर प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी या कार्यक्रमाचा स्वागत व प्रास्ताविक केले. राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी विक्रांत माळी यांनी देशभक्तीपर गीत गायन करून उपस्थितांच्या मध्ये भावनिकता निर्माण केली.
मा. राजेंद्र मस्के यांनी हर घर तिरंगा अभियानाची उद्देश स्पष्ट करून तिरंगा वापरण्यास संदर्भातचा प्रोटोकॉलचे कसे पालन करावे या संदर्भातची सविस्तर माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते डॉ. महावीर अक्कोळे यांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवा संदर्भात माहितीपूर्ण विवेचन केले. प्राचार्य डॉ. कोरे यांनी या कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले. अत्यंत भावनाप्रधान, उत्साहपूर्ण व जोश असणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
या रॅलीचे वैशिष्टय म्हणजे पोलीस निरीक्षक मा. राजेंद्र मस्के यांचे नेतृत्व- हातात तिरंगा - डॉ. महावीर अक्कोळे - सर्व प्राध्यापक व शिक्षक- पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी -उत्तम पद्धतीने नियोजन- रॅलीच्या पुढे सायरन वाजवत पोलीस गाडी - रॅलीत सुरुवातीस एनसीसी कॅडेट - राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी - प्रत्येकाच्या हातात तिरंगा - रॅली शांततेत व निर्विघ्नपणे पार पडली.
जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा. राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी, जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर, डॉ.जे. जे. मगदूम होमिओपॅथिक कॉलेज व लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलच या शैक्षणिक संस्थेतील एनसीसी(NCC) व राष्ट्रीय सेवा योजनेच्या(NSS) विद्यार्थ्यांनी 'हर घर तिरंगा' जनजागृती रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
प्रा. सुनील चौगुले,प्रा. बाळगोंडा पाटील व जयसिंगपूर कॉलेजचे प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा