Breaking

शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२

*कागल पोलिस ठाण्यात राखी पौर्णिमा उत्साहात साजरी*


एन सी सी. विद्यार्थी कडून रक्षाबंधन


*प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*


                कागलच्या डी. आर. माने महाविद्यालयातील एन. सी. सी. विभाग आणि माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कागल पोलिस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.विनायक सातुसे यांनी आपल्या सुमधुर शब्द सुमनांनी करून या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सांगितला. यानंतर विवेक पोतदार यांनी या कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. 


    या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. अजितकुमार जाधव पोलिस निरीक्षक, कागल पोलिस स्टेशन यांनी आपल्या ओघवत्या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले. ते बोलताना म्हणाले की, कर्तव्य बजावत असताना आम्हांला आमच्या कुटुंबाला फार वेळ देता येत नाही. आजच्या दिवशी आमच्या बहिणीकडून राखी बांधून घेण्यासाठी ही जाता येत नाही. परंतु ती रक्षाबंधनाची खंत एन सी. सी. व माजी विद्यार्थी संघ यांनी जाणवू दिली नाही. त्याबद्दल आज खरोखरच मन भरून आले आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद त्यानंतर कॅप्टन डॉ संतोष जेठिथोर यांनी या आशा उपक्रमाच्या माध्यमातून पोलिस व एन. सी. सी. यांच्यातील संबंध दृढ होण्यास मदत होईल.

 यावेळी प्रा.आबासाहेब चौगले, एन. सी. सी. कॅडेट व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवधूत पोतदार यांनी केले.

     या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा