Breaking

सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२

*राष्ट्रीय विचारधारा लोकसेवा फांउंडेशन व जयप्रकाश खादी ग्रामोद्योग भांडाराच्या स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण संपन्न*


दिव्यांग बंधू श्री लंगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

*विपुल पुजारी : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर  : राष्ट्रीय विचारधारा लोकसेवा फांउंडेशन व जयप्रकाश खादी ग्रामोद्योग भांडार जयसिंगपूर यांचे वतीने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी दिन साजरा करण्यात आला.यावेळी दिव्यांग श्री लंगरे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .तसेच महात्मा गांधीच्या प्रतिमेला वंदन आणि कालवश स्वातंत्र्य सैनिक साथी संभाजीराव जाधव यांचे प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

     संस्थेचे अध्यक्ष डॉ.चिदानंद आवळेकर, उपाध्यक्ष माधुरी चौगुले व प्रमिला कामत यांची स्वातंत्र्याच्या 75 वर्षातील विविध क्षेत्रातील घडामोडी च्या संदर्भात प्रेरणादायी भाषणे झाली .

         सदर कार्यक्रमास नेहा मुरदंडे , अरूणा शहा , मिना चुडाप्पा , प्रमिला कदम , साजिदा घोरी , रागिणी शर्मा , खादी भांडार सचिव जाधव वहिणी श्री व सौ कांबळे टेलर , जायंट सहेली पधाधिकारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा