Breaking

सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२

*आमदार मा.राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशनच्या वतीने आश्रम शाळेत जिलेबीचे वितरण*


आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशनच्या वतीने जीलबी वितरण


*विपुल पुजारी  : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आमदार मा.राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशनच्या वतीने आश्रम शाळेत जिलेबी,बिस्किट व केळी वाटप करण्यात आले.

      सामाजिक कार्यकर्ते मा. विनायक गायकवाड व माजी नगरसेवक गुंडाप्पा पवार यांच्या नेतृत्वाखाली आज स्वातंत्र्यदिनी दरवर्षीप्रमाणे जयसिंगपूराच्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जिलेबी,केळी व बिस्किट वाटून या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचं काम या सेवाभावी संस्थेने केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते चंदू भंडारे, संदीप शिंदे, विशाल वारे, सचिन कांबळे, विपुल पुजारी, सचिन ढाले व व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

     या कार्यक्रम प्रसंगी आश्रम शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी या सेवाभावी कृती बद्दल समाधान व्यक्त केले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा