![]() |
मोफत आरोग्य तपासणी व इ-श्रम कार्ड वाटप |
*सौ. गीता माने : सहसंपादक*
जयसिंगपूर : भारताच्या स्वातंत्र्य अमृतमहोत्सव दिनानिमित्त स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य, शिवसेना जयसिंगपूर शहर व पायस हॉस्पिटल यांच्या सहकार्यातून मोफत आरोग्य तपासणी शिबीर व ई -श्रम कार्ड वाटप संपन्न झाले. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला
मोफत आरोग्य तपासणी शिबीर व ई-श्रम कार्ड वाटप आज करण्यात आले,जयसिंगपूर मधील शाहूनगर येथील महालक्ष्मी मंदिर येथे या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते,मोफत शिबिरास जयसिंगपूर वासियानी चांगला प्रतिसाद देत २०० व इ - श्रम कार्डाचे १०० लाभार्थी होते.
सुरुवातीस या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री.पराग पाटील माजी नगरसेवक, माजी आमदार उल्हास पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख वैभव उगळे, शिवसेना जयसिंगपूर शहर प्रमुख तेजस कुराडे-देशमुख, एजाज मुजावर संस्थापक अध्यक्ष स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, उपाध्यक्ष सुरेश राठोड, शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख साजिद गोरी, संभाजीपुर ग्रामपंचायत सदस्य मनीषा पवार, अर्चना भोजणे, इजाज मुजावर साहेब, फैजल डांगे,प्रा.डॉ. प्रभाकर माने, बंडू उरुणकर, गुरुदेव माळी हे मान्यवरानी सदर शिबीर स्थळी उपस्थित होते.
इ-श्रम कार्ड काढण्याचे काम विक्रांत माळी व भोलू शर्मा यांनी केले. या कार्यक्रमाचे स्वागत संस्थापक अध्यक्ष एजाज मुजावर यांनी केले व आभार गुरुनाथ माळी यांनी मानले. सदर शिबिरास जयसिंगपूरातील मान्यवरांनी सदिच्छा भेटी दिल्या. तसेच पायोसचे सर्व कर्मचारी यांनी हे शिबिर उत्तम पद्धतीने पार पाडले. श्री महालक्ष्मी मंदिराच्या ट्रस्टींनी सदर शिबिरास पार पडण्यास मोलाचे सहकार्य केले.
एजाज मुजावर यांच्या नेतृत्वाखाली विक्रांत माळी, इजाज काले, सिद्धार्थ कोरे व भोलू शर्मा त्यांनी उत्तम पद्धतीने सदर शिबिर यशस्वीपणे संपन्न केले. या मोफत आरोग्य शिबिरा बाबत जयसिंगपूर येथील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. भविष्यातही अशा प्रकारच्या शिबिराची आवश्यकता असल्याबाबतची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा