![]() |
स्वातंत्र्य सैनिक व माजी सैनिकांचा सन्मान करताना मा. तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ व मा.शंकर कवितके |
*नामदेव निर्मळे : टाकळीवाडी प्रतिनिधी*
टाकळीवाडी : भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवा निमित्त स्वातंत्र्य सैनिक व माजी सैनिक यांचा प्रशासनाकडून येथोचित सन्मान झाला.येथील माजी सैनिक सुभेदार संजय बदामे , मोहन निर्मळे, सुभेदार केंदबा कांबळे, मनोहर कोळी, समीर आरकटे, वसंत बिरणगे यांचा प्रशासनाकडून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणारे शिरोळचे तहसीलदार मा.डॉ.सौ.अपर्णा मोरे- धुमाळ व शिरोळचे गट विकास अधिकारी मा.श्री शंकर कवितके यांच्याकडून सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी त्यांनी या स्वातंत्र सैनिक व माजी सैनिकांच्या बद्दल गौरव उदगार काढले. या कार्यक्रमास टाकळी वाडीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा