Breaking

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०२२

*जयसिंगपूर कॉलेजमध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन डॉ. सुभाष अडदंडे यांचे हस्ते ध्वजारोहण संपन्न ; सांस्कृतिक कार्यक्रमाने निर्माण केले उत्साहाचे वातावरण*

 

ध्वजपूजन व ध्वजारोहण करताना डॉ. सुभाष अडदंडे व मान्यवर

*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामतीचे जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा अर्थात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे, कॉलेजचे प्र. प्राचार्य प्रा.डॉ. एन.पी.सावंत व संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

    सुरुवातीस संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे यांचे हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रा.राम चौगुले यांच्या नेतृत्वाखाली अनेकांत स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीताचे गायन झाले. यानंतर एनसीसी प्रमुख प्रा.सुशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली एनसीसी सिनियर कॅडटने डॉ. अडदंडे यांचे कडून ड्रिल मार्च पासिंगची अनुमती घेतली. अत्यंत उत्तम पद्धतीने एनसीसी कॅडेट्सनी मार्च पास करीत उपस्थितांच्या कडून वाहवा मिळविला. यानंतर कॉलेजचे प्र.प्राचार्य प्रा. डॉ.एन. पी.सावंत यांनी एनसीसी कॅडेटना शपथ दिली. एन.एस. एस.कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी एन.एस. एस.च्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांना एनएसएसची प्रतिज्ञा दिली. 

     अत्यंत उत्तम पद्धतीने सुरू असलेल्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमामध्ये  अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी रिद्धी देसाई,अनवी अडदंडे,श्रुती रुणवाल, प्रणव पाटील, निरव पाटील, श्रावणी गायकवाड, रितू खवाटे, आयर्न बैरागदार, निखात मोमीन, यांनी अत्यंत सुंदर व प्रेरित करणारे भाषणे केली. उपस्थितांनी त्यांच्या भाषणाला मनापासून दाद दिली.यानंतर सुरू झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमा मध्ये  अनेकांत वाद्यवृंद समूह गीत- देशभक्तीपर गीत , स्वर्ग से सुंदर देशभक्तीपर गीत व उंच उंच गगनात तिरंगा या समूहगीताचे गायन केले.


     प्रा. डॉ. के.डी.खळदकर यांच्या नेतृत्वाखाली एनएसएस विभागाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये चमकदार कामगिरी केली. विक्रांत माळी याने 'ए मेरे वतन के लोंगो' या द्वि आवाजात देशभक्तीपर गीत गाऊन उपस्थितांकडून कौतुकाची थाप घेतली. कु.नेहा राठोर यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत सुंदर असे देशभक्तीपर समूह नृत्य संपन्न झाले.कु.विद्या दळवी व रणजीत हेरवाडे व त्याच्या साथीदारांनी समूह गीत गायले. अत्यंत सुंदर,प्रेरणादायी व सर्वांना मंत्रमुग्ध करणारा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात व प्रसन्न वातावरणात संपन्न झाला.यानंतर कु.प्रेरणा भाट व कु.प्रिती कोरे या विद्यार्थिनींनी अत्यंत सुंदर अशी भाषणे केली.

       यानंतर कॉलेजचे प्र. प्राचार्य प्रा. डॉ. नितीश सावंत यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या मध्ये नवचैतन्य व आशावाद निर्माण करणारे मौलिक मार्गदर्शन केले.अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूलचे टीचर व विद्यार्थ्यांनी वंदे मातरम हे गीत गाऊन कार्यक्रमाचा समारोप केला. 


    या अगोदर राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाकडून चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन यशस्वीपणे करण्यात आले. शुक्रवार दि.१२,२०२२ रोजी जनजागृती करणारे प्रचंड मोठी रॅली काढण्यात आली.महाविद्यालयाच्या प्रांगणात शासनाच्या आदेशानुसार शनिवार दि.१३ रोजी संस्थेचे खजिनदार मा.पद्माकर पाटील यांच्या हस्ते व रविवार  दि.१४ रोजी डॉ. शीतल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

     या ध्वजारोहण कार्यक्रमास मा. अशोक शिरगुप्पे,मा.अशोक मादनाईक ,प्रा.आप्पासाहेब भगाटे,मा.विपीन खाडे,डॉ.धवल कुमार पाटील,अभिजीत अडदंडे,अभिजीत शिरगुप्पे,मा.महावीर पाटील,डॉ. अनिल पाटील, प्रा.के. बी.पाटील व प्रा पी.सी.पाटील उपस्थित होते.

     त्याचबरोबर संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे यांचे कुटुंबीय व नातेवाईक उपस्थित होते. कॉलेजचे सर्व उपप्राचार्य, प्रा.डॉ. एन.एल.कदम,प्रा.डॉ. मनिषा काळे,प्रा.डॉ. एस.बी.बनसोडे,प्रा.सौ.एम. एस.पाटील, पर्यवेक्षक-प्रा. बी.ए.आलदर, कार्यालयीन अधिक्षक डॉ. संजीव मगदूम,संजय चावरे, कॉलेज मधील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व सेवक त्याचबरोबर अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापिका मा.अश्विनी पाटील व त्यांचा सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सुंदर अशा कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा. बाळगोंडा पाटील यांनी केले.

         या कार्यक्रमास उपस्थितांना अनेकांत नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने मोफत जिलेबी वाटप करण्यात आले.

    स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कॉलेजने आयोजित केलेल्या सर्व उपक्रमाचे कौतुक विद्यार्थी व पालक वर्गाकडून करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा